रत्नागिरी : मंडणगड तालुक्यात आढळली अश्मयुगीन कातळशिल्पे

Petroglyph
Petroglyph
Published on
Updated on

[author title="विनोद पवार" image="http://"][/author]

मंडणगड : तालुक्यातील धामणी-बोरखत येथे सापडलेल्या एका कातळ शिल्पानंतर या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या काटे कातळकोड या गावातील मोकळ्या सडधावर बीस कातळशिल्पे आढळून आली आहेत. या शिल्पांमध्ये मानवी आकृती, पक्षी व प्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. या कातळशिल्पांचे संशोधन व संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. पूर्वकालीन ऐतिहासिक वारसा जतन होणे आवश्यक असून, तालुक्याच्या पर्यटनाला नवा आयाम मिळणार आहे.

प्रागैतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे विशेष महत्त्व आहे. अश्मयुगीन काळातील आदिमानवाने दगडात कोरून ठेवलेल्या विविध शिल्पे किंवा चित्रांना रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती गुढ खोदचित्रे आहेत. या शिल्पांचा काळ मध्य अश्मयुगीन म्हणजे इसवी सन पूर्व काळ असावा, असे मत अभ्यासक नोंदवतात. महाराष्ट्रात कोकण भागात अशी कातळशिल्पे आढळून आली आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात माळावर अशी शिल्पे आढळून आली आहेत. यामध्ये राजापूरमधील बारसू देवाचे गोठणे येथे मोठ्या संख्येने शिल्पे सापडली आहेत. गणपतीपुळे, उंबलें, धामणी या ठिकाणी शिल्प आढळले. बारसूनंतर इतक्या मोठ्या संख्येने मंडणगड तालुक्यात काटे येथे शिल्पे सापडल्याने त्यांचे तातडीने संशोधन व संगोपनाचे दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोकणातील सड्यांवर यापूर्वी आढळलेल्या कातळ शिल्पांतील रेखाचित्रांप्रमाणेच येथे चित्रे आढळून आली आहेत. ही कातळशिल्पे नेमकी कोणत्या कालखंडातील खोदलेली असतील किंवा किती वर्षे जुनी असतील याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. कातळ शिल्पे काटे व कातळकोड या गावांपासून जवळ असली तरी शिल्पे असलेला कातळ भाग आहे. या भागाचे सरकारी दप्तरी सात-बारावर कातळमाळ हे नाव आहे, तरी हा परिसर वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. काही जण या भागाला सडा, गुडेघर गावातील गावकरी या भागाला मारग म्हणतात. सडघावर असलेल्या कातळ माळावर दीन ऐरणी आहेत आणि या दोन ऐरणी दरम्यान ही सर्व लहान मोठी कातळ शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये एक मानवी आकृती वेगवेगळ्या आकाराचे मासे, गाय, बैल, बकरी, मुंगूस, शंकराची पिंड आणि इतर वेगवेगळी न समजता येईल अशी लहान मोठी अशी कोरलेली वीस कातळ शिल्पे बघायला मिळतात. या कातळ शिल्पे असलेल्या भागापासून जवळच जंगलात उंच टेपावर एक पाणबुरुज सुद्धा आहे त्याला बाबुल टेंबा असेही म्हणतात. Petroglyph

संवर्धन होणे आवश्यक

याबाबत गुडेवर गावचे निसर्गप्रेमी अभ्यासक प्रितेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, परिसरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मित्रांच्या मदतीने भटकंती करून ही कातळशिल्प शोध मोहीम राबवली असे सांगितले. यामध्ये विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आढळून आली असून त्यांची साफसफाई करून सभोवताली दगड लावून सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या कातळशिल्पांचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

या भागात आणखी कातळशिल्पे आढळून येण्याची शक्यता आहे. संबंधित जमीन मालकांनी या कातळ शिल्पांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याचे जतन आणि संवर्धन करावे. यामुळे त्यांच्या जागेला देखील महत्त्व प्राप्त होणार आहे.

– डॉ. अजय धनावडे
पुरातत्त्व अभ्यासक

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news