परभणी हळहळली : शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून गुणवंत विद्यार्थिनीने संपवले जीवन

गुणवंत विद्यार्थिनीने संपवले जीवन
गुणवंत विद्यार्थिनीने संपवले जीवन
Published on
Updated on

परभणी ; आनंद ढोणे पूर्णा तालुक्‍यातील आहेरवाडी येथील अल्‍पभूधारक शेतकरी कुटुंबातील वडिलांचे छत्र हरपलेली एक गुणवंत मुलगी होती. मात्र बारावी विज्ञान शाखेतील या विद्यार्थीनीने शिक्षणात आर्थिक समस्‍या अडसर ठरत असल्‍याच्या तणावात तीने १७ जून रोजी मध्यरात्री वसमत येथील विद्यानगरातील खोलीतील छताच्या लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी १८ जून रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दिपीका दौलत खंदारे असे जीवन संपवलेल्‍या या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद झाली.

या हृदयद्रावक घटनेविषयी प्राप्त झालेली माहिती अशी की, पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील दिपीका दौलत खंदारे ही यंदाच्या शैक्षणीक वर्षात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेण्याच्या तयारीत होती. त्‍यासाठी नीट परीक्षा देवून वैद्यकिय कोर्स पूर्ण करुन डॉक्टर होण्याचे स्वप्न तीने उराशी बाळगले होते. हे स्‍वप्न साकार करण्याच्या आशेने धडपडत असतानाच शिक्षणात गरिबी आणि आर्थिक समस्या भेडासवत असल्यामुळे ती तणावात होती.

अखेर वसमत येथील रुममध्ये छताच्या लोखंडी कडीला साडी बांधून तीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. दिपीका हि शिक्षणात गुणवंत असल्याने तीने तिचे काका प्रा. राजेश खंदारे यांच्या आहेरवाडी येथीलच संकल्प कोचिंग क्लासेस मध्ये शिकून वर्ष २०२३ मध्ये ९३.८० टक्के गुण घेतले होते. त्यानंतर दर्जेदार शिक्षण घेवून तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तिने लातूर येथील शाहू महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला. तेथील प्रवेशपरीक्षा दिली. मात्र थोडक्या गुणावरुन तिचा प्रवेश निष्फळ ठरला.
परंतू तिने जिद्द न सोडता नांदेड येथील आर आर सी कोचिंग क्लासेस वस्तीगृहासाठी पूर्वपरिक्षा देवून पन्नास टक्के फि माफीत प्रवेश घेत अकरावी विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले. शिवाय दहा वर्षापूर्वी मोटारसायकल अपघातात वडिलांचे निधन झालेल्‍या आणि कुटूंबात २ एकर बेताची जमीन त्यातून शिक्षणाचा आणि रुमभाडे खर्च भागत नव्हता. बहिण जना हिचे डिफार्मशी कंपलेट झालेली व दहावीत शिकणारा भाऊ गजानन यांच्या शिक्षणाचाही खर्च पेलवत नव्हता. अशा आर्थिक समस्या तिच्या समोर आ वासून उभ्या होत्या.

त्यामुळे ती अकरावी नंतर बारावीला प्रवेश घेवून पुढे निट करुन मेडिकल लाईनचे शिक्षण घेण्याचा संकल्प सोडून वसमतला रुमवर आली होती.१७ जून सोमवार रोजी ती व विधवा आई मिराबाई मोठी बहिण,भाऊ व मामाची शिक्षणासाठी राहणारे लेकरे हे रात्री जेवण करून झोपी गेले. मात्र दिपीका ही रात्री साअकरा बारा वाजेपर्यंत पुस्तक हातात घेवून अभ्यास करत बसली होती. तिच्याजवळ आईही बसून जागत होती. त्यावेळी आईने तीला बाई आता झोप उशिर झालाय असे सांगितले. त्यावर दिपीकाने आपण अभ्‍यास करणार असल्‍याचे सांगितले. यावर आई व ईतर सर्वजण झोपी गेल्याची खात्री केल्यानंतर दिपीकाने राहत्या घराच्या किचन मधील छताच्या लोखंडी कडीला साडीबांधून गळफास घेत जिवनयात्रा संपवली. या मन हेलावून टाकणा-या घटनेमुळे आहेरवाडी परिसरासह पंचक्रोशीत एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news