‘या’ तारखेपासून शनी होतोय वक्री; पुढील ५ महिने असतील खडतर

file photo
file photo

[author title="चिराग दारुवाला, प्रसिद्ध ज्योतिष" image="http://"][/author]

पुढारी ऑनलाईन डेस्क : शनी ग्रह ३० जूनला दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी कुंभ राशीत वक्री होत आहे. वक्री शनीचा हा कालावधी १५ जून, २०२४ पर्यंत असेल. हा कालावधी सर्वांसाठी चिंतन आणि पुर्नविचार करण्याचा आहे. ज्योतिष शास्त्रात वक्री शनीला फार महत्त्व दिले गेले आहे. या कालावधीत शनीचा आपल्या जीवनावरील प्रभाव विस्तारतो. तर वक्री शनीचा आपल्या करिअरवर, आर्थिक निर्णयांवर काय परिणाम होईल हे आपण जाणून घेऊ.

मेष

वक्री शनी तुमचा मैत्रीप्रति आणि सामाजिक संबंधाबद्दलचा दृष्टिकोन बदलेल. तुमच्या असे लक्षात येईल तुमचे काही मित्र खरे नाहीत. शनीच्या प्रभावामुळे तुम्ही कोणाशी मैत्री ठेवायची आणि कोणाशी नाही, हा निर्णय घेऊ शकाल. संख्येपेक्षा नात्यांच्या दर्जाला महत्त्व द्यावे. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ते लोक तुमची स्वप्नं आणि तुमची ध्येय यांना पाठबळ देत नसतील तर तुम्ही त्यांना शंकेच्या नजरेने पाहाल. या काळात तुम्ही एक पाऊल मागे घ्या आणि तुमच्या जबाबदाऱ्यांचा पुर्नविचार करा.

वृषभ

रोमँटिक नातेसंबंधात नेमकी काय मूल्यं आहेत, याचा तुम्ही पुर्नविचार कराल. तुम्ही जेव्हा करिअर, व्यावसायिक ध्येय यांचा जास्त विचार करता, तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे नातेसंबंधाचे गणित बदलते आणि जोडीदारासोबत तात्पुरता दुरावा निर्माण होऊ शकतो. या काळा नातेसंबंधाबद्दल अधिक गंभीर बनण्याचा आहे. नातेसंबंधाचा काही उपयोग आपले भविष्यातील ध्येय गाठण्यात होतो का याचा विचार तुम्ही गांभीर्याने कराल.

मिथुन

या काळात तुम्ही तुमच्या नातेसंबंधाचा खोलवर विचार कराल. तुमची नाती भक्कम पायवर उभी आहेत का ती डळमळीत आहेत? सध्या सुरू असलेल्या समस्यांवर मार्ग काढण्याचा हा कालखंड आहे. नातेसंबंधात व्यवाहरिक आणि सत्य राहा, असे शनी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे दीर्घकाळात तुम्ही योग्य लोकांसोबत राहाल आणि दीर्घकालीन उद्दिष्टं आणि मूल्यं याच्याशी हे सुसंगत राहील. याचा अर्थ असा आहे की प्रेमजीवनात तुम्ही शिकत राहा. तुमचा वैयक्तिक विकास आणि इतरांसोबतचे नातेसंबंध यावर काम करा.

कर्क

या कालावधित तुम्हाला प्रेमसंबंध आणि रिलेशनशिप यामध्ये बऱ्याच अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी दृढ संबंध प्रस्थापिक कराल आणि ऐकमेकांच्या भावना समजू शकाल. पण या कालावधित भावना व्यक्त करण्यात येत असलेल्या अडथळ्यांमुळे किंवा चुकीचे संदेश दिले गेल्याने भावनिक अंतर वाढेल आणि गैरसमजही होतील. अशा प्रकारचे गैरसमज आणि संघर्ष टाळण्यासाठी तुमच्या भावना आणि विचार व्यक्त करताना पारदर्शक राहा. भूतकाळाचे सिंहावलोकन करा, जुन्या समस्या आणि जुन्या समस्या पुन्हा एकदा आठवा.

सिंह

वक्री काळ तुमच्यासाठी नातेसंबंधातील तुमच्या दृष्टिकोनावर पुनर्विचार करण्याचा आहे. तुमच्या वर्तणुकीत एखादा पॅटर्न आहे का, ज्यावर तुम्हाला सुधारणा करावी लागेल. शनीचा प्रभाव तुम्हाला लोकांशी संबंध ठेवण्याबद्दल अधिक जबाबदार आणि पोक्त बनवले, त्यामुळे दृढ संबंध निर्माण होतील. या काळात तुम्हाला तुमचे कुटुंब, नातेवाईक, मित्र यांच्याशी अधिक प्रामाणिक राहावे लागेल, अर्थात काही कठीण संवादासाठी तयार राहावे लागेल. जे सिंगल आहेत, त्यांनी गंभीर आणि विश्वासार्ह जोडीदार मिळण्यासाठी लक्ष केंद्रित करता येईल.

कन्या

शनीच्या वक्री काळात तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या जोडीदाराबद्दल अधिकाधिक चिकित्सक बनाल. तुम्ही अधिक संवेदनशील बनला, तसेच अतिविचारामुळे थकून जाल. या काळात तुम्हाला स्वतःबद्दल आणि तुमच्या जोडीदाराबद्दल प्रामाणिक राहावे लागेल. जर तुम्ही जर आरोग्याकडे दुलर्क्ष करत असाल किंवा कामामुळे तुमच्या जीवनावर प्रभाव पडत असेल तर वक्री शनी तुम्हाला चिंतन करायला भाग पाडेल. स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या, त्याचा तुम्हाला लाभ होईल शिवाय तुमचे नातेसंबंधही सुधारतील. तणावाचा सामना करण्यासाठी जोडीदाराशी स्पष्ट संवाद साधा आणि दोघांनी एकत्रित मार्ग काढा.

तूळ

प्रेमजीवना गोंधळाचा राहील, शनी तुम्हाला संथ होण्याबद्दल सांगत आहे, त्यामुळे गोष्टी सहज घ्या आणि योग्य वेळेची वाट पाहा. शनी असा ग्रह आहे, जो आपल्याला आपली मुळं घट्ट बनवण्यात मदत करतो. त्यामुळे या काळात संवादात खुलेपणा आणि प्रामाणिकपणा ठेवा. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील तर पर्यायांचा विचार करा. तुमचा मोबाईल बाजूला ठेवा, महागड्या हॉटेलना रामराम करा आणि अंतर्मनाचा शोध घ्या.

वृश्चिक

वक्री शनी तुम्हाला स्वतःमध्ये पाहाण्याची आणि तुमचा मानसिक पाया भक्कम आहे का, हे पाहाण्याची आठवण करून देईल. या काळात तुम्ही नातेसंबंधात जास्तीजास्त मानसिक विश्वासार्हता आणि स्थैर्य याची अपेक्षा ठेवाल. भूतकाळात जाऊन कौटुंबिक आठवणींना उजाळा द्याल. भूतकाळातून सध्या ही सुरू असलेल्या समस्यांकडे पाहा आणि आताच्या नातेसंबंधावर ते कसा प्रभाव टाकत आहेत, ते पाहून त्यावर तोडगा काढा. नातेवाईक आणि तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्ती यांच्यात एक सीमारेषा असली पाहिजे, त्यातून तुम्हाला मानसिक आरोग्या लाभेल.

धनू

शनी वक्री असण्याच्या काळात तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे आणि अचूकपण व्यक्त करू शकणार नाही. तुम्हाला जोडीदारसोबत विचार व्यक्त करताना गैरसमज आणि अडचणींना तोंड द्यावे लागेल. हा कालावधी जास्तीजास्त ऐकण्याचा आहे आणि खोलवर चर्चा झाल्याशिवाय निर्णय घेऊ नका. प्रामाणिक संवादातून कुटुंबीयांसोबतचे संबंध बळकट होतील. कामानिमित्त सातत्याने जास्त प्रवास करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी सातत्याने चांगला संवाद ठेवाला पाहिजे.

मकर

नातेसंबंधात तुम्ही काय महत्त्वाचे मानता यावर पुनर्विचार करण्याचा हा कालावधी आहे. वक्री काळात तुमचे नातेसंबंध असणाऱ्या व्यक्तींची मूल्यं, दीर्घकालीन ध्येय समान आहेत का याचाही विचार कराल. तुम्हाला स्थीर आणि सुरक्षित नातेसंबंध हवे आहे, ते तुम्ही प्रामाणिकपणा, दीर्घकालीन नियोजन आणि वचनबद्धता या कसोटींवर असतील असे पाहाल. जोडीदारासंबंधीचे विश्वासाशी संबंधित जे मुद्दे आहेत, ते दूर करा आणि दृढ नातेसंबंधावर भर द्या. नातेसंबंधातील आर्थिक विषय सोडवण्याकडेही तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

कुंभ

तुम्ही स्वतःबद्दल किती खरे आहात, याचा विचार करण्याचा हा कालावधी आहे. या कालावधित तुम्ही जोडीदाराचे ऐकाल आणि जोडीदाराबद्दल अधिक गंभीर व्हाल. नातेसंबंधातील वचनबद्धता आणि विश्वासार्हता यांची भूमिका तुम्ही समजून घ्याला, याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. नातेसंबंधात आत्मविश्वास आणि स्वतःची किंमत अधिक बळकट करण्याची संधी तुम्हाला या काळात मिळणार आहे. स्वतःमध्ये असणारी असुरक्षेची भावना आणि भीतीमुळे नातेसंबंधासाठी तुम्ही सर्वोत्तम देऊ शकलेला नाही, यावरही तुम्ही या काळात सुधारणा कराल.

मीन

या काळात तुम्ही जुन्या नातेसंबंधाच्या स्मृती, त्यांचा भावनिक पॅटर्न समजून घेण्याला उजाळा द्याल. मनाशी संबंधित दबाव आणि बांधून ठेवल्याची भावना जास्त राहील. जुन्या वेदान समजून घ्या आणि जुने अडथळे दूर करा, जेणे करून तुम्ही पूर्णपणे प्रेम कराल आणि आनंदी राहाल. तुमचे नातेसंबंधातून तुम्हाला नव्या गोष्टींचा उलगडा होईल. शांतपणे आणि स्पष्टपणाने या बदलांना समोर जा. कोणतीही आतातायी प्रतिक्रिया देऊन नका कारण यातून अधिक गुंतागुंत तयार होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news