Nagpur factory blast : ‘चामुंडा’ स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून मदत : देवेंद्र फडणवीस

Nagpur factory blast : ‘चामुंडा’  स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून मदत :  देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी परिसरातील चामुण्डा एक्सप्लोझिव्ह कंपनीत गुरूवारी (दि. १३) स्फोट झाला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने मदत दिली जाणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले, या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. या घटनेत ३ जण गंभीर असून, त्यांना दंदे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिस आयुक्तांशी मी संपर्कात असून, जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट दिली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news