नितीन गडकरींना उत्तर वगळता पाचही मतदारसंघात आघाडी

नितीन गडकरी
नितीन गडकरी

[author title="राजेंद्र उट्टलवार " image="http://"][/author]

नागपूर

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपनेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा संसदेत पोहोचले. काँग्रेसला मध्यमध्ये यावेळी भाजपवर नाराज असलेले हलबा, मुस्लीम साथ देतील असा मोठा विश्वास असताना त्यांनी व्यक्तिगत पातळीवर गडकरींनाच साथ दिल्याचे उघड झाले. उत्तर नागपूर विधानसभा वगळता शहरातील उर्वरित पाचही विधानसभा क्षेत्रांमध्ये गडकरींनाच जनतेची साथ मिळाली. काँग्रेसच्या पराभवाचे उत्तर यातच दडलेले आहे.

अधिक वाचा –

नागपूर शहराचा विचार केल्यास सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत. यापैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार तर दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यामध्ये दक्षिण-पश्चिमचे प्रतिनिधित्व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतात. दक्षिणमध्ये भाजपचेच मोहन मते, मध्यमध्ये भाजपचे विकास कुंभारे व पूर्वमध्ये भाजपचे कृष्णा खोपडे आमदार आहेत. उत्तर नागपुरात काँग्रेसचे माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत तर पश्चिमचे नेतृत्व लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार स्वतः आमदार विकास ठाकरे यांच्याकडे आहे.

गडकरींची घेतली दिवस-रात्र मेहनत 

यंदाची निवडणूक काँग्रेसने एकजुटीने लढविल्याचे चित्र दिसले. काँग्रेसने विकास ठाकरेंच्या रुपाने ओबीसी कार्ड खेळले, सोबतच विविध ओबीसी संघटना व कुणबी संघटनांनीही विकास ठाकरेंना समर्थन दिल्याची चर्चा होती. यामुळे भाजपकडे वळणारा हा प्रवर्ग यंदा ठाकरेंकडे वळणार अशी धाकधूक भाजपला होती. गडकरींनाही नागपूर, विदर्भ नव्हे तर देशात मोठ्या प्रमाणात काम असताना दिवसरात्र चांगलीच मेहनत घ्यावी लागली.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमध्ये त्यांनी दोन-दोनदा प्रचार, रॅलीच्या माध्यमातून नागरिकांचा आशीर्वाद मागितला तरी गेल्या दोन निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे मताधिक्य कमी झाले. यावेळी त्यांचा १.३७ लाख ६०३ मतांनी विजय झाला. यामध्येही त्यांना पूर्व नागपुरातुन सर्वाधिक ७३,३७१ इतके मताधिक्य मिळाले.

अधिक वाचा –

देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिममधून ३३,५३५, दक्षिणमधून २९,७१२, मध्यमध्ये २५,८६१,विकास ठाकरे आमदार असलेल्या पश्चिममध्ये ६,६०३ इतके मताधिक्य मिळाले. केवळ उत्तर नागपूरमध्येच गडकरींना ठाकरेंच्या तुलनेत ३२,२१५ इतकी कमी मते मिळाली. येथे गडकरींना ९०१९१ तर ठाकरेंना १,२२,४०६ इतकी मते मिळाली.

मोठ्या प्रमाणात हलबा समाजाचे प्राबल्य असलेल्या मध्य नागपूर यंदा भाजपवर नाराज असल्याची चर्चा निवडणुकीच्या काळात रंगली होती. त्यामुळे हलबा यंदा भाजपला साथ देणार की, काँग्रेसकडे वळणार? अशी धाकधुक होती. परंतु, मध्य नागपुरात गडकरींनी केलेले काम आणि त्यांचा नागरिकांशी असलेला जनसंपर्क यामुळे मध्य नागपुरने यंदाही गडकरींची साथ सोडली नाही. त्यांनी गडकरींना ठाकरेंच्या तुलनेत २६ हजार ८६१ इतके मताधिक्य दिले.

विधानसभानिहाय मिळालेली मते – 

उमेदवार              दक्षिण-पश्चिम    दक्षिण-पूर्व   मध्य        पश्चिम     उत्तर       पोस्टल        मते
नितीन गडकरी     ११३५०१            ११२४५७     १४१३१३   ९६९०६   ९८४४२    ९०१९१       २२१८
विकास ठाकरे      ७९९६६            ८२७४५       ६७९४२   ७१०४४   ९१८३८    १२२४०६      १४८३

अधिक वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news