Lok Sabha Election 2024 Results| लोकसभेची कसर विधानसभेत व्याजासह भरून काढू : देवेंद्र फडणवीस 

File Photo
File Photo

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन या लोकसभेची कसर व्याजासह आम्ही भरून काढू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.४) व्यक्त केला. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतील.पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत दिले असून नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी निवडणूक निकालानंतर दिली.

फडणवीस म्हणाले,  इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती. मात्र, देशातील जनतेने भक्कमपणे नरेंद्र  मोदींना साथ दिली.  संविधान बदलणार, असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news