‘काळम्मावाडी’ची गळती काढण्यासाठी 80 कोटी मंजूर

‘काळम्मावाडी’ची गळती काढण्यासाठी 80 कोटी मंजूर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी 80 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली. गळतीमुळे वाया जाणारे लाखो लिटर पाणी आता वाचणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रशासकीय मान्यता दिली.

शासनाच्या या निर्णयामुळे शेतीसह नदीकाठच्या गावांना तसेच शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे. काळम्मावाडी धरणाची साठवण क्षमता 25.40 टीएमसी आहे. गळतीमुळे तो साठा 19.68 टीएमसी इतकाच ठेवावा लागतो. धरणातून प्रतिसेकंद साडेतीनशे लिटर म्हणजे दररोज तीन कोटी लिटर पाणी गळत्यांमधून वाया जाते. यामुळे धरणात फक्त सहा टीएमसी इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

येत्या पावसाळ्यापर्यंत गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यास येत्या पावसाळ्यापासून पूर्ण म्हणजे 25.40 टीएमसी इतक्या क्षमतेने पाणीसाठा राहील. त्यामुळे साहजिकच शेतीसह पिण्यासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होईल. तसेच; कोल्हापूर शहरासाठी दिवाळीपासून सुरू होत असलेल्या थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा 24 तास होईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभले. असेही पत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news