चंद्रपूर : ताडोबात वाघिणीच्या भ्रमणमार्गात अडथळा; १० जिप्सी महिनाभरासाठी निलंबित

File photo
File photo

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सकाळच्या सफारी दरम्यान एका वाघिणीच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या दहा जिप्सींसह मार्गदर्शकावर महिनाभरासाठी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. तर हंगामी पर्यटन वाहन चालकांवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. आठवडाभरानंतर ही कार्यवाही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक कुशाग्र पाठक यांनी केली आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सकाळ आणि सायंकाळी सफारीची सुविधा पर्यटकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ताडोबात त्यांना सफारीसाठी जिप्सी आणि मार्गदर्शकही पुरविण्यात येतात. जिप्सीद्वारेच पर्यटकांना सफारी करणे बंधनकारक आहे. दिनांक 17 मे रोजी कोअर झोनमध्ये सकाळी खातोडा ते ताडोबा मार्गावर पर्यटकांना घेऊन एका क्रुझरसह दहा वाहने पर्यटकांना घेऊन सफारी करण्यात आली. वाघीन T-114 हि कोअर झोनमधील सफारी सुरू असलेल्या मार्गाने भ्रमणकरीत असताना सदर जिप्सींनी तिचा मार्ग अडवून अडथळा निर्माण केला आणि पर्यटनाचा आनंद लुटला. दरम्यान माध्यमांमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आठवडाभरानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने या प्रकाराची दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी करून वाघिणीच्या मार्गावर अडथळा निर्माण करण्यात येऊन व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने निष्पन्न झाल्याने जिप्सी, वाहन चालक व मार्गदर्शकांवर कार्यवाही करण्यात आली आहे.

वाहन क्रमांक एम.एच. 34 ए.एम. AM 4534, एम.एच. 34 ए.एम.0144, एम.एच. 34 ए.एम.7783, एम.एच. 34 बि.एफ. 4404, एम.एच. 12 टि.वाय. 0879, एम.एच. 34 ए.एम.2803, एम.एच. 12 टि. वाय. 5385, एम.एच. 34 ए.एम.2291, एम.एच. 12 टि. वाय. 4791, एम.एच. 34 सि डी. 5203 (शा.वा. क्रुझर) या वाहनांवर महिनाभरासाठी निलंबीत करून 3 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच वाहन चालक हे हंगामी असल्याने त्यांना यापुढे पर्यटन वाहनांवर कायमचे बंद करण्यात आले आहे. तसेच वाहनांवरील मार्गदर्शक यांना एक महिण्याकरीता तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.

जिप्सी वाहनांवर बघीरा ॲपचे नियंत्रण

प्रकल्प व्यवस्थापनाने पर्यटनावर नियत्रंण करण्यासाठी काही पर्यटन मार्ग आणि ठिकाणे ठरवलेली आहेत, जिथे अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते, त्या क्षेत्रात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची पथके त्या भागात नेहमी गस्त घालत असतात व काही पर्यटन मार्ग सुद्धा एकेरी करण्यात आलेले असुन पर्यटन जिप्सी वाहनावर बघीरा अॅप व्दारे नियत्रंण ठेवण्यात येत असते. भविष्यात अश्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिप्सी चालक आणि मार्गदर्शक यांची बैठक घेऊन अशा घटनांबाबत आवश्यक दक्षता घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news