ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आढळले 327 मोर; सर्वात जास्त मोर कोअर झोनमध्ये | पुढारी

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आढळले 327 मोर; सर्वात जास्त मोर कोअर झोनमध्ये

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पार पडलेल्या वन्यप्राणी गणनेत वाघ, बिबट, अस्वल व अन्य वन्यप्राण्यांसोबतच पक्षांचीही संख्या पर्यटकांना आता आकर्षित करणारी ठरणार आहे. कारण, दोन्ही झोन मध्ये मोरांची संख्या 327 आढळून आली आहे. यात कोअरमध्ये 230 तर बफरमध्ये 97 मोर आहेत.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हटला तर फक्त वाघच डोळ्यासमोर येतात. पर्यटकही व्याघ्र दर्शनासाठी सफारी करतात. परंतु ताडोबा फक्त वाघच नव्हे तर अन्य वन्यप्राणी आणि विविध जातींच्या पक्षांसाठी प्रसिध्द आहे. वाघ आणि बिबट जसे पर्यटकांना भूरळ घालतात. त्याप्रमाने आता येथील मोरही पंखांचा पिसारा फुलवून भुरळ घालनार आहेत.

कोअर झोन हा अतिसंवेदनशील भाग आहे. याच भागात मोरांची संख्या जास्त आढळून आली आहे. त्यामध्येही सर्वात जास्त मोर कोळसा आणि ताडोबा वन परिक्षेत्रात आहेत. त्यापाठोपाठ कोलारा 28, मोहरली 19 तर कारवा मध्ये 13 मोर आहेत. बफर झोन 97 मोरांच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त शिवणी वनपरिक्षेत्रात 37, मुल मध्ये 21, खडसंगी मध्ये 19 तर चंद्रपूर व पळसगाव मध्ये अनुक्रमे 5 व 2 मोर आढळून आलेत. बफर झोन मानवी वस्तीशी निगडित असल्याने या ठिकाणी मोरांची संख्या कमी आहे. ताडोबात फक्त वाघ, बिबटे, अस्वलच नव्हे तर अन्य वण्यप्राण्यांची संख्या पर्यटकांनाही आकर्षित करणारी आहे.

Back to top button