Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार २३ मे २०२४
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज सरकारी काम पूर्ण होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक शांती ही तुमची प्राथमिकता असेल. मुलांचा अभ्यास किंवा करिअरबाबत चिंता वाढेल. अचानक एखादा खर्च येऊ शकतो. यामुळे बजेट खराब होऊ शकते. सामाजिक कार्यात काम करताना नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. व्यवसायात नवीन यश तुमची वाट पाहत आहे. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, आज सामंजस्याने मतभेद आणि गैरसमज दूर होतील. व्यावसायिक अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढवू नका. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. व्यवसायात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराच्या तब्येतीत काही चढ-उतार होतील. अति परिश्रमामुळे आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चेतून समस्येवर तोडगा काढाल. एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा होऊ शकते. भाऊ आणि नातेवाइकांमध्ये सुरू असलेला वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवला जाईल. अनेक बाबतीत संयम बाळगणे आवश्यक आहे. राग आणि घाईमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिक कामात काही अडचणी येऊ शकतात. घर-कुटुंब आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. तणावाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होईल.
कर्क : श्रीगणेश म्हणतात की, संततीशी संबंधित कोणतेही विशेष काम पूर्ण केल्याने आराम मिळेल. वैयक्तिक कामांवर पूर्ण लक्ष द्या. आर्थिक व्यवहारात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. अनावश्यक खर्चात कपात करा. विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांच्या करिअरशी संबंधित कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायातील क्षेत्राशी संबंधित योजनेवर गांभीर्याने काम करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. पती-पत्नीमध्ये सुरू असलेले गैरसमज दूर होतील.
सिंह : काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून आज तुम्हाला आराम मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. व्यवसायात अत्यंत साधेपणाने काम करण्याची गरज आहे. पती-पत्नीचे नाते मधुर होईल. आरोग्य चांगले राहील.
कन्या : आज कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. आर्थिक बाबींसाठी वेळ अनुकूल आहे. भविष्यातील योजनांबाबत कोणाशीही चर्चा करु नका, अशी सूचना श्रीगणेश करतात. नातेवाइकांशी पैशाबाबत व्यवहार करताना नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित तुमची कोणतीही कृती फायदेशीर ठरू शकते. व्यसनाधीन लोकांपासून दूर रहा.
तूळ : आज फोन कॉलद्वारे एक महत्त्वाची सूचना प्राप्त होईल. मात्र त्याची तातडीने अंमलबजावणी करणे योग्य ठरेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ व्यतित कराल. भविष्यातील कोणतीही योजना बनवताना तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या, असा सल्ला श्रीगणेश देतात. इतरांवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरेल. आज पेमेंट किंवा उधार घेतलेले पैसे परत मिळू शकतात. जोडीदाराचा पाठिंबा नेहमीच तुमच्या फायद्यासाठी सिद्ध होईल.
वृश्चिक : श्रीगणेश म्हणतात की, चुकीच्या कामांकडे लक्ष न देता तुमच्या वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करा. कोणतीही दीर्घकाळ सुरु असणारा तणाव दूर होऊ शकतो. कोणतेही काम करण्यापूर्वी सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा. जमीन खरेदीशी संबंधित कामांमध्ये जास्त लाभाची अपेक्षा करू नका. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. व्यवसायात क्षेत्राशी संबंधित योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्याबाबतच्या नियमित तपासणी करून घ्या.
धनु : श्रीगणेश सांगतात की, आज घरगुती कामात बहुतांश वेळ व्यतित कराल. धार्मिक संस्थेशी संबंधित कामातही तुमचा सहभाग असेल. तुमचा संशयास्पद स्वभाव तुमच्यासाठी आणि इतरांना त्रास देऊ शकतो. वेळेनुसार वागण्यात बदल करा. तुमच्या योजना आणि उपक्रम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नवीन कामालाही सुरुवात होईल. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ जाईल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
मकर : जवळच्या नातेवाईकाची समस्या सोडवण्यात तुमचे विशेष योगदान असेल, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या कौशल्याची प्रशंसा होईल. तुम्हाला काही शुभ सूचना मिळू शकतात. मात्र हितशत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू नका. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सामंजस्य राखणे आवश्यक असेल. भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांशी सुसंवाद राहील. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. तब्येतीत कोणतीही अडचण येणार नाही.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, मनोरंजन आणि खरेदी उपक्रमांमध्ये आनंददायी वेळ जाईल. तुम्ही घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे कौतुक होईल. आर्थिक प्राप्तीतील नकारत्मकतेमुळे चिडचिड आणि निराशेची भावना असेल. नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. पती-पत्नी कोणत्याही समस्येवर तोडगा काढू शकतील. पोटविकारामुळे अस्वस्थ वाटेल.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आज केवळ स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रीत करा. इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करु नका. मित्राबद्दल अप्रिय बातमी मिळाल्याने मन उदास होईल. व्यवसायाशी संबंधित प्रकल्पाबाबत समस्या उद्भवू शकतात. पती-पत्नी एकमेकांच्या सामंजस्याने योग्य ती व्यवस्था करतील. धोकादायक कामे टाळा. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या समस्या दूर होतील. शेजाऱ्यांशी वाद टाळा.