कोकणात आठ ठिकाणी साकारणार ‘कोस्टल टाईड पूल टुरिझम’

कोकणात आठ ठिकाणी साकारणार ‘कोस्टल टाईड पूल टुरिझम’

[author title="राजेश चव्हाण" image="http://"][/author]

रत्नागिरी ः जैवविधतने संपन्न असलेल्या कोकण किनारपट्टी भागात नैसर्गिक उद्भवणार्‍या सागरी भरती- ओहोटीच्या नैसर्गिक चक्रात व सागरी समतल भागात उघड होणार्‍या जादुई दुनियेतील जैवविधता आता पर्यटकांना अनुभवता येणार आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग उलगडून दाखविण्यासाठी एमटीडीसीमार्फत कोकणातील किनारी भागातील 8 गावांमध्ये 'कोस्टल टाईड पूल टुरिझम' प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे.

जैवविविधतेचे नंदनवन असलेल्या कोकण किनारपट्टीच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग दडलेले आहे. ते उघड करण्याकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत हे कोस्टल टाईड पूल टुरिझम विकसित करण्यात येणार आहेत. किनारी भागात निसर्ग पर्यटनासह रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

सागरी भागात ओहोटीच्या कालावधीत किनार्‍यावर असलेल्या खडकाळ भाग पाण्याच्या वर दिसू लागतो. भरतीच्या वेळी हा भाग पाण्याखाली जातो. या निसर्गचक्रात किनार्‍यालगत अत्यंत दुर्मीळ अशी जैवविधता आढळते. यावेळी या क्षेत्रात अनेक चमत्कारिक रचना पाहायला मिळतात. यालाच 'रॉक टाईड पूल' असेही म्हणतात. हे रॉक टाईड पूल अनेक समुद्री जीवांसाठी लघुअधिवास असतात. यामध्ये खडकाळ किनार्‍यांवर सूक्ष्म जीवांची घनता सर्वाधिक असते. त्याचबरोबर प्राणी व वनस्पतीच्या प्रजातींची उत्तम जैवविविधता या ठिकाणी आढळते. अनेक समुद्री जीव खडकाळ खळग्यांमध्ये तात्पुरता आसरा घेतात, अन्नाचा स्रोत म्हणून यांचा वापर करतात तर काही प्रजातींसाठी ही जागा प्रजननासाठी उत्तम पोषण निवारा असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे ओहोटी आणि भरतीच्या कालावधीतही ही सफर समुद्रातील जैवविविधतेच्या एका विलक्षण जगाची अनुभूती करुन देणारी असणार आहे. तसेच पर्यटनीय आनंद देऊन जाणारी आहे. या घटकांमुळे या भागात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे, यासाठी आता खारफुटी सवर्धन आणि संशोधन केंद्रानेही पुढाकार घेतला आहे.

कोकणातील अद्भुत दुनियेची होणार सफर…

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागात असे अनेक रॉकी टाईड पूल आहेत. अलीकडे या स्थळांचा अभ्यास झाला. या अभ्यासात येथील भागात साडेतीनशेपेक्षा जास्त समुद्री जीव आढळले. यात समुद्र शैवालाच्या 30 प्रजाती, वनस्पती प्लवकाच्या 80 प्रजाती, प्राणी प्लवकाच्या 73 प्रजाती, डोळ्यांना दिसणारे प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे व अपृष्ठवंशीय म्हणजे कवचधारी यांच्या 80 ते 90 प्रजाती तसेच पक्ष्यांच्या 30 प्रजाती कोकणातील किनारपट्टीवर आढळून आल्या आहेत. आता या अभ्यासाचा उपयोग पर्यटन वाढीसाठी आणि उपजीविकेसाठी करण्यात येणार आहे.

या गावांची निवड…

कोकण किनारपट्टी भागात 228 कि.मी. क्षेत्रफळात जैवविविधतेचे जादुई जग विस्तारलेले आहे. मात्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटनासाठी सुलभ आणि सुरक्षेच्या द़ृष्टीने कोकणातील 8 गावांची निविड केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग, कुणकेश्वर आणि भोगवे या तीन; तर रत्नागिरी जिल्ह्यातील काटघर, हेदवी, खारवीवाडा, वेळास आणि वेळणेश्वर या पाच ठिकाणी 'कोस्टल टाईड पूल टुरिझम' पाईंट विकसित करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news