सतेज पाटील केडीसीसीवर गगनबावडा संस्था गटातून बिनविरोध - पुढारी

सतेज पाटील केडीसीसीवर गगनबावडा संस्था गटातून बिनविरोध

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन  

विधानपरिषदेचे बिनविरोध मैदान मारणारे गृहराज्यंमत्री सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणातही (केडीसीसीवर ) बिनविरोध मैदान मारले आहे. गगनबावडा तालुका संस्था गटात पाटील यांचा एकमेव अर्ज असून त्यांच्यासोबत डमी म्हणून दोन अर्ज भरले होते, त्यांचे अर्ज मागे घेण्याची औपचारिकता बाकी आहे.

७ त; २१ डिसेंबरअखेर माघारीची मुदत आहे. पहिल्याच दिवशी विजयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांनी महिला गटातून अर्ज भरला असून उमेदवारीची मागणी केली आहे. माजी खासदार निवेदिता माने आणि उदयानी साळुंखे या गटातून प्रतिनिधित्व करत आहेत.

जिल्हा बँकेच्या राजकारणात संस्था गटात प्रचंड चुरस असून ठरावधारक आपल्या बाजुने वळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. अनेक संचालकांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे.

गगनबावडा तालुका संस्था गटात याआधी पी. जी. शिंदे यांचे प्राबल्य होते. मात्र, यावेळी शिंदे यांनी अर्ज दाखले केलेला नाही. पालकमंत्री पाटील यांनी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल केला होता. गगनबावडा संस्था गटातून काल मांडुकली पैकी खोपडेवाडीच्या महादेव केशव पडवळ आणि पळसंबेच्या दीपक पांडुरंग लाड यांनी अर्ज दाखल केले होते. हे दोन्ही ठरावधारक पाटील यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे या दोघांनी हे अर्ज मागे घेण्याची औपचारिकता बाकी आहे.

सतेज पाटील केडीसीसीवर बिनविरोध : ६६ पैकी ४६ ठरावधारक पाटील यांच्यामागे

गगनबावडा संस्था गटात ६६ ठरावधारक असून पालकमंत्री पाटील यांनी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत ४६ ठरावधारक होते. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असे म्हटले जात होते. आज (शुक्रवारी) अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. दुपारी ३ वाजेपर्यंत या गटात पाटील यांच्यासह केवळ तीनच अर्ज दाखल झाले.

हेही वाचा : 

Back to top button