Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, २३ एप्रिल २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, २३ एप्रिल २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आज सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ व्‍यतित केल्‍यास तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. तरुण ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील. घाईत घेतलेले निर्णय बदलावे लागतील. कोणतीही गोष्‍ट समजून घेऊनच करा, असे श्रीगणेश सांगतात. वैयक्तिक कामांसाठी योग्य वेळ न मिळाल्याने निराशा जाणवेल. व्यवसायात अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. पती-पत्नीचे नाते मधुर राहील.
वृषभ : आज कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. तुम्हाला नक्कीच चांगले यश मिळेल. तरुणांना स्पर्धेत यशस्वी होण्याचे योग आहेत, असे श्रीगणेश सांगतात आर्थिक बाबतीत व्यवहारासाठी वेळ अनुकूल नाही. तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा दबावही असल्‍याने स्‍वत:च्‍या कामांवर लक्ष केंद्रित करता येणार नाही. कामाच्या ठिकाणी मशिन, कर्मचारी इत्यादींबाबत समस्या उद्भवू शकतात.
मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आर्थिक स्थिती चांगली राहील. शेजाऱ्यांना मदत कराल. स्वभावात लवचिकता असणे महत्त्वाचे आहे. राग आणि हट्टीपणा यासारख्या नकारात्मक सवयींवर मात करा; एकमेकांशी समन्वय साधून कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. यावेळी व्यावसायिक कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अशी सूचना श्रीगणेश करतात. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य असेल.
कर्क : आज तुमच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष देणे भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, असे श्रीगणेश सांगतात. दैनंदिन ताणतणावापासून मुक्त राहिल्‍याने मानसिक शांती मिळण्‍यास मदत करेल. कलात्मक क्षेत्रात रुची वाढेल. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणताही महत्त्वाचा निर्णय टाळा. आज व्यवसायातील महत्त्‍वाच्‍या बाबींकडे दुर्लक्ष करु नका.
सिंह : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ असल्याचे श्रीगणेश सांगतात. जवळच्या नातेवाईकाचे सहकार्यही मिळेल. परिस्थिती अनुकूल राहील. तुमची इच्छा पूर्ण होईल. सामाजिक कार्यातही सहभागी व्‍हाल. तुमची व्‍यक्‍तिगत कामांची चर्चा करु नका. घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याच्या समस्येमुळे महत्त्वाचे काम थांबू शकते.
कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस उत्तम आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. मागील अनेक दिवस प्रलंबित असणारी आर्थिक प्रश्‍न मार्गी लागेल. सामाजिक कार्यात वेळ व्‍यतित घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि आनंद मिळेल. कोणाशीही वाद घालू नका. स्वतःच्या कृतींवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. मुलांना जास्त मोकळीक दिल्याने त्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते. घरातील कोणाच्याही आरोग्याची चिंता सतावेल. व्यवसायातील सर्व कामे सुरळीत सुरु राहतील.
तूळ : आज कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्या तुमच्यावर न घेता कुटुंबातील सदस्यांसोबत वाटून घ्या. यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. मालमत्ता विक्री किंवा खरेदीसाठी योग्‍य वेळ आहे. मुलांकडून समाधानकारक कामगिरी न झाल्‍याने निराशाजनक वाटेल; पण संयम आणि विवेकाने परिस्‍थिती हाताळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कठोर मेहनतीनंतरच यश मिळेल.
वृश्चिक : आज ग्रहस्थिती अनुकूल आहे. तुमची दिनचर्या शिस्तबद्ध ठेवल्‍यास अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी करेल. तरुण त्यांच्या यशावर असमाधानी असतील. त्‍यांना अधिक मेहनत करण्याची गरज आहे. कोणताही निर्णय घेताना विलंब करु नका. कार्यक्षेत्रातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.
धनु : तरुणांना व्यावसायिक अभ्यासात योग्य यश मिळेल. घर बदलण्याची योजना असेल तर ती अंमलात आणण्यासाठी आजच योग्य वेळ आहे. जमीन किंवा वाहनाशी संबंधित कोणतेही कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. महिलांनी त्यांच्या प्रतिष्ठेबद्दल अधिक जागरूक असले पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात यंत्रणा व्यवस्थित ठेवली जाईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील, असे श्रीगणेश सांगतात.
मकर : आज जवळचे नातेवाईकांचा पाहुणचार करावा लागेल. सामाजिक उपक्रमांमध्ये तुमचा सहभाग तुमचा आदर वाढवेल. लक्षात ठेवा की किरकोळ गैरसमजांमुळे मित्र किंवा भावंडांशी संबंध खराब होऊ शकतात. इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. नकारात्मक गोष्टींना वर्तमानावर वर्चस्व देऊ नका. आज व्यवसायात अत्यंत साधेपणाने आणि गांभीर्याने काम करण्याची गरज आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज काही महत्त्वाच्‍या कामात यश मिळेल. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. महिलांसाठी वेळ अनुकूल आहे. त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक क्रियाकलाप योग्यरित्या पूर्ण करू शकतील. शेजाऱ्यांशी संबंध खराब करू नका. कोणत्याही चुकीच्या कामांकडे लक्ष देऊ नका. सामाजिक आणि राजकीय कार्यात आपली प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. घरातील वातावरण प्रसन्न आणि शांत राहील.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस एक सुखद अनुभव असेल. तुम्हाला खूप तणावमुक्त वाटेल. कोणत्याही मुलाखतीत यश मिळाल्याने तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. कोणत्‍याही गोष्‍टीवर विश्वास ठेवू नका. कल्पनांच्या या दुनियेतून बाहेर पडा. वास्‍तवाचा विचार करा. काही आवश्यक खर्च देखील येऊ शकतात. कामात अधिक एकाग्रता आणि गांभीर्य असण्याची गरज आहे. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे कठीण काळात पूर्ण सहकार्य मिळेल.

Back to top button