

पोलादपूर ; धनराज गोपाळ मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात ट्रेलरची कारला धडक बसून या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना रविवार रोजी सायंकाळी ६.२० सुमारास भोगाव गावाच्या हद्दीत घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ट्रेलर क्रमांक एम एच 14 एफ टी 7864 वरील चालक रवी राजेंद्र तिवारी राहणार प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश हे आपले ताब्यातील ट्रेलर पुणे ते रत्नागिरी असे चालवीत घेऊन जात होते. नमूद ठिकाणी आल्यावर सदर ट्रेलर हा पाठीमागे आल्याने त्याच्या मागे असलेली व्हॅगनार कार क्रमांक एम एच 02 डीजे 5893 ला धडक बसली. या अपघातामध्ये व्हॅगनार कार मध्ये असलेले चालक व त्यांची पत्नी हे किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार एस व्ही सुर्वे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर कुंभार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान पोलादपूर पोलिसांना या अपघाताची माहिती समजतात पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताचा पुढील तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रोडच्या बाजूला करण्यात आली असून महामार्गावर वाहतूक सुरळीत चालू आहे.
हेही वाचा :