रायगड : एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात; चालकासोबत १८ प्रवासी जखमी | पुढारी

रायगड : एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात; चालकासोबत १८ प्रवासी जखमी

पनवेल; विक्रम बाबर जव्हार डेपो येथून पंढरपूर दिशेने चाललेल्या एसटी बसचा कळंबोली सर्कल येथे अपघात झाला. या अपघातात चालका सोबत १८ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी 12 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास झाला.

एसटी बस नं.एम एच 12-बी टी -2090 ही वाडा (जवार) ते पंढरपूर अशी जात होती. यावेळी ही एसटी पनवेल कळंबोली सर्कल ते असुडगाव येथे आली असता कंटेनरला ठोकर मारल्याने अपघात झाला.

अपघातातील 18 जखमींना कामोठे येथील एम जि एम रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून, त्यांच्यावर औषध उपचार चालू आहेत. अपघातातील प्रवासी हे किरकोळ जखमी आहेत.

अपघातातील कंटेनर तेथून निघून गेलेला असून, एसटी बसचे नुकसान झालेले आहे. क्रेनच्या सहाय्याने एसटी बाजूला करण्यात आलेली आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button