Lok Sabha Election 2024 – नागपूर : पहिल्या ४ तासात २० टक्क्यापर्यंत मतदान, गैरसोयीमुळे नागरिकांकडून तक्रारीचा पाढा | पुढारी

Lok Sabha Election 2024 - नागपूर : पहिल्या ४ तासात २० टक्क्यापर्यंत मतदान, गैरसोयीमुळे नागरिकांकडून तक्रारीचा पाढा

राजेंद्र उट्टलवार

नागपूर

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी सकाळी सात वाजतापासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली. पहिल्या ४ तासात नागपूर विभागातील ५ मतदारसंघात सरासरी २० टक्क्यांपर्यंत मतदान झाले. जिल्ह्यातील अनेक जागी मतदान केंद्रावर सुविधा नाही, पतीचे नाव आहे पत्नीचे नाव नाही, नाव असूनही मतदान करू दिले गेले नाही, अशा तक्रारी ‘पुढारी’शी बोलताना कन्हान परिसरात पिपरी नगर परिषद केंद्राबाहेर लक्ष्मी रोकडे, आशा भिसे, राजेंद्र भिसे, कैलास कामडे यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. कामठीतही हेच चित्र दिसले.

या मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, शिवसेनेचे राजू पारवे अशी थेट लढतीत किशोर गजभिये वंचितच्या पाठींब्यावर यावेळी अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. नागपूर आणि रामटेक मतदारसंघ मिळून एकूण ४२ लाख ७२ हजार ३६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून रामटेकमध्ये २४०५ तर नागपूरमध्ये २१०५ मतदान केंद्र आहेत. नागपूर लोकसभा मतदार संघात पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवाजीनगर (मतदान केंद्र क्र. ३१४, ३१५ आणि ३१६) येथे शंकरनगर परिसरातील सरस्वती विद्यालयात मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसले.

एकूण ३३२७ मतदार आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काँग्रेसचे विकास ठाकरे थेट लढत असलेल्या चुरशीच्या लढतीत नागपूर शहरातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची सकाळपासून गर्दी पाहायला मिळाली. नागपूर विभागातील ५ लोकसभा मतदारसंघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदान झाले.

७ ते ९ पर्यंत लोकसभा मतदारसंघ निहाय मतदान

९- रामटेक ५.८२ %

१०- नागपूर ६.४१%

११- भंडारा-गोंदिया ७.२२ %

१२- गडचिरोली -चिमूर ८.४३%

१३- चंद्रपूर ७.४४%

९ ते ११ वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान

रामटेक १६.१४ टक्के

नागपूर १७.५३ टक्के
भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के

गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के

आणि चंद्रपूर १८.९४ टक्के आहे.

Back to top button