आज सूर्याचा मेष राशीत प्रवेश : ‘या’ राशींच्या जीवनात टर्निंग पॉईंट, तर ‘या’ राशींना जबरदस्त लाभ | Sun Transit in Aries | पुढारी

आज सूर्याचा मेष राशीत प्रवेश : 'या' राशींच्या जीवनात टर्निंग पॉईंट, तर 'या' राशींना जबरदस्त लाभ | Sun Transit in Aries

चिराग दारूवाला :

ज्योतिषशास्त्रात गोचरला विशेष असे महत्त्व आहे. एखाद्या ग्रहाचे, ताऱ्याचे स्थित्यांतर म्हणजे गोचर होय. शनिवारी (१३ मार्च) सूर्य मेष राशीत प्रवेश करत आहे. या सूर्य गोचरचा प्रभाव सगळ्याच  राशींवर दिसणार आहे. काही राशींना या गोचरचा फार शुभ परिणाम मिळणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात त्याची रास बदल असतो. याला सूर्य संक्राती असे नाव आहे. या महिन्यात १३ एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करत आहे. सूर्य हा अग्नीतत्त्वाचा आहे तर मेष राशी जलतत्त्वाची आहे. त्यामुळे सूर्याचे हे गोचर मोठा बदल मानला जात आहे. या गोचरमुळे हवामानावरही परिणाम होईल, तर चार राशींवर याचा नकारात्मक प्रभाव दिसेल. या राशी करिअर, पैसा याबाबतीत आव्हानांचा सामना करतील. सूर्य गोचर संदर्भात ख्यातनाम ज्योतिष चिराग दारूवाला यांनी दिलेली ही माहिती.

मेष – जीवनातील टर्निंग पॉईंट

सूर्याचे मेष राशीतील गोचर या राशीच्या लोकांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. मेषचा राशिस्वामी मंगळ आहे. हे गोचर मेष राशीसाठी शुभवार्ता घेऊन येईल आणि मेष राशीच्या लोकांना पदोन्नतीच्या संधी मिळतील. जे लोक सरकारी क्षेत्रात काम करतात त्यांनाही पदोन्नती मिळेल तसेच खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनाही पदोन्नतीचे योग आहेत. तुमची अभ्यासातील गती वाढेल, त्यामुळे चांगले परिणाम मिळतील.

वृषभ – पराक्रमात वाढ होईल

सूर्य गोचर तुमच्यासाठी लाभ घेऊन येत आहे. तुमचे धैर्य आणि पराक्रम यात वाढ होईल, तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या समाजिक प्रतिष्ठेत भर पडेल. तुम्ही तुमच्या ऊर्जेचा पूर्ण वापर करून काम केले तर तुम्हाला जास्त यश मिळेल. कुटुंबात लहान भावासोबत मतभेद होऊ देऊ नका. धार्मिक, सामाजिक आणि अध्यात्मिक गोष्टींत रस वाढेल. परदेशातील कंपन्यात कामासाठीचे किंवा परदेशातील नागरिकत्वासाठीच्या प्रयत्नांत यश मिळेल.

मिथुन – आरोग्याची काळजी घ्या

सूर्य गोचर काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, विशेष करून डोळ्यांच्या संदर्भात सतर्क राहा. रागावर नियंत्रण ठेवा. भांडण, तंटा यापासून दूर राहा आणि कोर्टकचेरीची कामे कोर्टाबाहेर सोडवण्याचा प्रयत्न करा. वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात, किंवा स्थावर मालमत्तेबद्दल वाद सुटतील. कामाच्या ठिकाणी षड्यंत्रांचे बळी पडण्यापासून सावध राहा. त्यामुळे आपले काम संपवा आणि घरी या, असा भूमिका घ्या. कुटुंबातील वातावरण तणावाचे राहाणार नाही, याकडे लक्ष ठेवा.

कर्क – वैवाहिक जीवनातील कटुता संपेल

सूर्य गोचरमुळे कर्क राशीच्या लोकांसाठीची वेळ टप्प्याटप्प्याने सुधारत जाईल. सूर्य तुमच्या राशीतील दुसऱ्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या गोचरमुळे कर्क राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील आणि तुमच्या प्रकृतीच्या समस्याही नियंत्रणात राहतील. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील आणि व्यापारात चांगले परिणाम मिळतील. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल, नोकरीत योग्य पगार आणि पदोन्नती मिळेल. वैवाहिक जीवनातील कटुता संपेल.

सिंह – घाईगडबडीत निर्णय घेऊ नका

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. पण या गोचर काळात सूर्य तुमच्या राशीतील बाराव्या स्थानी आहे. त्यामुळे परदेशात स्थायिक असलेल्या तसेच परदेशात व्यापार करत असलेल्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळतील. पण या काळात सिंह राशीच्या लोकांची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे या काळात बाहेर खाद्यपदार्थ टाळा आणि संतुलीत आहार घ्या. ध्यानधारणेचा लाभ होईल. कुटुंबातील कोणी ज्येष्ठ व्यक्ती आजारी असतील त्यांची विशेष काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी साठवलेले पैसे खर्च करणे टाळावेत. व्यापारात घाईगडबडीत निर्णय घेऊ नका, त्यामुळे तोटा होऊ शकतो.

कन्या – आर्थिक लाभ होईल

सूर्याच्या मेष राशीतील गोचरचा फार चांगला लाभ कन्या राशीला होणार आहे. तुमच्या समोरील जी आर्थिक आव्हाने आहेत त्यातून मार्ग निघेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल. प्रशासन आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींच्या वर्तुळात तुमचा प्रभाव वाढेल. जर तुम्ही खासगी क्षेत्रात कार्यरत असाल तर तुमची पदोन्नती होईल. पण प्रेमजीवनात काही तणाव वाढू शकतो, त्यामुळे अहंकार बाजूला ठेवा आणि प्रेमाला महत्त्व द्या. विद्यार्थ्यांची अभ्यासात चांगली प्रगती होईल आणि तुम्ही अधिक कष्ट घ्याल. पण या गोचर काळात तुम्हाला आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.

तूळ – पगारवाढीचे योग

गोचरचा तूळ राशीच्या करिअरवर प्रभाव दिसेल आणि पगारवाढीच्या सकारात्मक योग आहेत. व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाल. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि सर्व कामे तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. कुटुंबीयांतील नातेसंबंध सुधारतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत, सचे वादविवादांना सहजरीत्या तोंड द्याल.

वृश्चिक – धर्म आणि अध्यात्मात रुची घ्याल

सूर्य गोचरमुळे तुम्हाला विविध प्रकारे यश मिळणार आहे. भाग्यवृद्धी होईल आणि तुम्ही धर्म, अध्यात्म यात रस घ्याल. नवी व्यवहार करणार असाल तर हे गोचर लाभदायक ठरेल. तुम्ही धार्मिक संस्थांत सहभाग घ्याल आणि धानधर्म कराल. तुमच्या धाडसामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल. तुमचे नियोजन आणि डावपेच गोपनीय ठेवा.

धनू – षड्यंत्राचे बळी पडू नका

गोचर काळातील प्रभाव अकल्पनीय असेल. जमीन, संपत्ती, वडिलार्जित मालमत्ता या संबंधित वादांवर तोडगा निघेल. तुमचा मानसन्मान, पद यात वृद्धी होईल, पण आरोग्यावर मात्र नकारात्मक परिणाम होईल. आग, विष, औषधे यापासून सावध राहा. लोक तुमच्या विरोधात षड्यंत्र रचतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही षड्यंत्राचे बळी पडणार नाही, असे पाहा. न्यायालयीन वाद कोर्टाबाहेर सोडवा.

मकर – वैवाहिक जीवनात अडचणी

गोचरच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात काही अडचणी येतील. सासरच्या लोकांशी वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्या. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा गोचर लाभाचा ठरेल. कोर्टकचेरीत सुरू असलेले वादांचा तोडगा तुमच्या बाजूने राहील. केंद्र आणि राज्य सरकारकडील कामे पूर्ण होतील.

कुंभ – निर्णयांचे कौतुक होईल

कुंभ राशीसाठी सूर्य गोचर लाभदायक ठरेल. पण काही बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे कौतुक होईल. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या मुलामुलींना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. प्रेमजीवनाशी संबंधित विषय सामान्य राहतील. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. मुलांशी संबंधित विषयांमुळे चिंता राहील.

मीन – उत्पन्नाचे मार्ग वाढतील

सूर्य गोचरमुळे तुम्हाला काही अनपेक्षित परिणाम मिळतील. अध्यात्मिक प्रगती तर होईलच जोडीने समाजात प्रतिष्ठाही वाढेल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील, फार दिवासांपूर्वी उधार दिलेले पैसे परत येतील. घरातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. मुलांबद्दल जबाबदारीची पूर्तता कराल. नवविवाहितांच्या जीवनात नव्या पाहुण्याचे आगमन होईल. प्रेमसंबंध सर्वसामन्य राहतील.

हेही वाचा

Back to top button