

नाशिक : माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप शनिवारी (दि.६) सायंकाळी चार वाजता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या संपर्क प्रमुख पदावरून त्यांना हटविण्यात आल्याने ते बऱ्याच दिवसापासून नाराज होते. त्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा हाेती. मात्र, आता ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.