सुषमा स्वराज यांनी तेव्हा इंदिरा गांधींना ललकारले होते | पुढारी

सुषमा स्वराज यांनी तेव्हा इंदिरा गांधींना ललकारले होते

हरियाणाच्या मंत्रिमंडळात 1978 मध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या पंचवीस वर्षीय सुषमा स्वराज यांनी त्यावेळी उत्तर प्रदेशातील फतेहपूर लोकसभा मतदार संघात थेट इंदिरा गांधी यांना व्यासपीठावर जाऊन आव्हान दिले होते. काँग्रेसने प्रेमदत्त तिवारी यांना मैदानात उतरविले होते, तर जनता पक्षाने सय्यद लियाकत हुसेन यांना उमेदवारी दिली होती.

केंद्रात तेव्हा जनता पक्ष सत्तेवर होता. काँग्रेस आणि जनता पक्ष अशा दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तिवारी यांच्यासाठी इंदिरा गांधींनी 45 जाहीर सभा घेतल्या. त्यातील एक सभा बिंदकी येथे झाली. त्यावेळी इंदिरा गांधी यांचे भाषण सुरू असताना सुषमा स्वराज थेट व्यासपीठावर चढल्या आणि म्हणाल्या, तुम्ही महिलांच्या विकासाबद्दल बोलत आहात. मात्र, त्यापूर्वी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला दिली पाहिजेत. यानंतर इंदिरा गांधी यांनी केवळ स्मित केले आणि तेथून निघून गेल्या. यादरम्यान, सुषमा स्वराज यांनी आणीबाणीच्या कालपर्वावर घणाघात करून महिलांची त्यात कशी गळचेपी केली गेली, यावर विशेष जोर दिला. या गोष्टी मतदारांच्या मनाला भिडल्या आणि जनता पक्षाचे सय्यद हुसेन बहुमताने विजयी झाले.

Back to top button