Lok Sabha Election 2024 : हेडमास्टरना मिळाला लिफाफा, त्यात होते निवडणुकीचे तिकीट | पुढारी

Lok Sabha Election 2024 : हेडमास्टरना मिळाला लिफाफा, त्यात होते निवडणुकीचे तिकीट

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील घोघरडीहा येथे एका शाळेत पंडित जगन्नाथ मिश्रा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांना अचानकपणे पोस्टमनकडून एक लिफाफा मिळाला. तो उघडून पाहिला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, त्यात त्यांना काँग्रेसने उमेदवारीसाठी तिकीट पाठवले होते. ही घटना आहे 1971 मधील. (Lok Sabha Election 2024)

त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. कारण, आपल्याला पक्षाकडून लोकसभेचे तिकीट मिळेल, यावर काही काळ खुद्द मिश्रा यांचाही विश्वास बसला नव्हता. त्यामुळे लोकांना तेव्हा वाटले की, काँग्रेसचे तालेवार नेते ललित नारायण मिश्रा यांचे बंधू डॉ. जगन्नाथ मिश्रा यांना काँग्रेसकडून लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. यानंतर खरोखरच कोणाला तिकीट मिळाले, यावरून भ्रम निर्माण झाला. अखेर काँग्रेसने दिल्लीहून खुलासा केला की, हे तिकीट पंडित जगन्नाथ मिश्रा यांना देण्यात आले आहे. मग सगळा भ्रम दूर झाला. सुरुवातीपासून काँग्रेसचे काम केल्यामुळे आणि स्वातंत्र्य सैनिक असल्याने त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती.

Back to top button