भंडारा : कवलेवाडा धरणावर आढळला तरुणीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या? | पुढारी

भंडारा : कवलेवाडा धरणावर आढळला तरुणीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

भंडारा : पुढारी वृत्‍तसेवा सिहोरा व तिरोडाच्या मध्यभागी असलेल्या कवलेवाडा धरणावर एका तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. ही घटना पोलिस स्टेशन सिहोराच्या हद्दीत वांगी नदीपात्रात उघडकीस आली. तरुणीची हत्या की आत्महत्या याबाबतचे रहस्य कायम आहे.

आचल धनराज कटरे (वय २०) रा. सराटी तालुका साकोली असे मृत तरुणीचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेचे रहस्य समोर येणार आहे.

घटनास्थळावर पोलिस उपविभागीय अधिकारी रश्मिता राव, पोलिस स्टेशन सिहोराचे ठाणेदार नितीन मदनकर, राजू साठवने, संतोष सिदने, मनोज इळपाते यांनी दाखल होत पाहणी केली. सदर तरुणी ही कवलेवाडा धरणावर कशी आली हा परिसरात चर्चेचा विषय असून या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button