सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ८० दुर्मीळ प्रजाती! | पुढारी

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ८० दुर्मीळ प्रजाती!

देवगड; पुढारी वृत्तसेवा : ज्युनिअर सायंटिस्ट, देवगड आणि भारतीय प्राणी वैज्ञानिक संस्था, पुणे यांच्या सहकार्याने कोकण कोस्टल मॅपिंग हा संशोधनात्मक प्रकल्प राबविण्यात आला. विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 80 दुर्मीळ समुद्रीय प्रजातींची नोंद झाली आहे. कुणकेश्वर किनारपट्टीवर सर्वाधिक 40 प्रजाती, मिठमुंबरी व मालवणमध्ये 13 तर वेंगुर्लेमध्ये 3 प्रजाती सापडल्या आहेत. या प्रजातींचे संशोधन पेपरही विद्यार्थी व प्राध्यापकांनी पूर्ण केले आहेत.

ऑक्टोबर 2023 मध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. संशोधनात सहभागी प्राणीशास्त्र विषयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. दुर्मीळ प्रजाती कशा हाताळाव्यात, प्रजाती कशा ओळखाव्यात, याबद्दल त्यांना सांगण्यात आले होते. या सर्वेक्षणात ङरािीेाशीींर रिश्ररारींर नावाची अतिशय दुर्मीळ तत्सम प्रजाती सापडली. वेींळश्रर ाूलींळीेळवशी नावाचा दुर्मीळ खेकडादेखील सापडला. हे सर्व करत असताना काही प्रजातींचे ठिकाण सुरक्षित करण्यात आले. काही असुरक्षित प्रजातींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अनेक प्रजाती प्राणी वैज्ञानिक संस्था पुणे येथे पुढील अभ्यासासाठी पाठविण्यात आल्या आहेत.

Back to top button