३७० कलम हटवण्यास राहुल गांधींनी विरोध केला : अमित शहा | पुढारी

३७० कलम हटवण्यास राहुल गांधींनी विरोध केला : अमित शहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांना हिशोब करायचा असेल तर त्यांच्या ५० वर्षाचा व आमच्या १० वर्षाचा हिशोब करावा, दहा वर्षाचं पारडं वजनदार दिसेल, पंतप्रधान मोदी यांनी १० वर्षात देशाला सुरक्षित करण्याचं काम केलं आहे. सर्जिकल स्टाईंकने पाकिस्तानच्या घरात घुसून आतंकवाद्यांचा खात्मा करण्याचं काम मोदी सरकारने केले आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ( दि. ५) जाहीर सभेत केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज त्यांची सभा पार पडली.

पुढे बोलताना शहा म्हणाले, ७० वर्षात काँग्रेस पक्ष ३७० कलम हटवू शकले नाही, पण पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये मोदींच्या कारकिर्दीत ३७० कलम हटविले. याबाबत अध्यादेश घेऊन मी पार्लमेंटमध्ये उभा राहिलो. तेव्हा राहुल गांधी यांनी हे कलम हटवण्यास विरोध केला. काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, असे ते म्हणाले. रक्ताच्या नद्या काय कोणी तिथला साधा दगडही कोणी उचलू शकले नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरला कायमचे भारताशी जोडण्याचं काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  आयोध्यात राम मंदिर व्हावं, अशी करोडो लोकांची इच्छा होती.  काँग्रेसने अनेक वर्षापासून राम जन्मभूमी प्रकरण लटकत ठेवले. परंतु पंतप्रधान मोदींमुळे आयोध्येत राम मंदिर झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न भाजपाने पुर्ण केले, असेही ते म्हणाले.

Back to top button