आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार ४ मार्च २०२४ | पुढारी

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार ४ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज तुमचा बहुतांश वेळ सामाजिक कार्यात जाईल. महत्त्वाची सूचना मिळेल. अनुभवी लोकांच्या सल्ल्या द्या. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. अवघड कामे ओढावून घेऊ नका, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते. आरोग्य चांगले राहील.

वृषभ : कोणत्याही कौटुंबिक समस्यांबाबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. घराच्‍या नूतनीकरणाबाबत विचार कराल. बोलताना अपशब्‍द वापरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, एखाद्याचा चुकीचा सल्ला तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. मित्र आणि नातेवाईकांसोबत वाद होणार नाही, याची काळजी घ्या. सध्याच्या परिस्थितीमुळे संयम राखणे आवश्यक आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मिथुन : आज कोणतेही अवघड काम तुम्ही तुमच्या मेहनतीने सोडवू शकता. अनावश्यक खर्च टाळा. शेजाऱ्यांच्‍या वादात पडू नका. अप्रिय बातमी मिळाल्याने मन उदास होऊ शकते. कार्यक्षेत्रात योग्य सुव्यवस्था राखली जाईल. अतिकामामुळे कुटुंबाला वेळ देता येणार नाही.

कर्क : आज कुटुंबासोबत मौजमजेत वेळ जाईल, असे श्रीगणेश सांगतात. भविष्यातील योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. घरातील आवश्यक वस्तूंसाठी ऑनलाइन खरेदी कराल. मुलांच्या संगतीकडे लक्ष ठेवा. आळसामुळे काही अपूर्ण काम मागे राहू शकते. काळानुरूप व्यवहारात बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, सामाजिक आणि धार्मिक कार्यात वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मनःशांती मिळेल. मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित कामे यशस्वी होतील. तुमची विशेष प्रतिभा लोकांसमोर येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. भावांसोबतचे संबंध खराब होणार नाहीत, याची काळजी घ्या. ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ चांगला आहे.

कन्या : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्‍ही तुमच्‍या परिश्रमाकडे लक्ष द्या. कोणत्‍याही प्रकारचा वाद सोडवण्यासाठी आज योग्य वेळ आहे. आळस आणि निष्काळजीपणामुळे काम टाळावे लागू शकते. वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम टाळावे. कोणत्याही अडचणीच्या वेळी कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या.

तूळ : श्रीगणेश सांगतात की, तुमच्या आवडीच्या कामांमध्ये जास्त वेळ व्‍यतित कराल. यामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि आनंद मिळेल. तुमची कामे नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडा. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणींमुळे तणाव राहील. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रवास टाळणे हिताचे ठरेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ अधिक अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील.

वृश्चिक : जवळच्या नातेवाईकांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कोणत्याही विशेष विषयावर चर्चा होईल, असे श्रीगणेश सांगतात. इमारत बांधकामाशी संबंधित रखडलेला आराखडा तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रवासाशी संबंधित कोणतेही काम टाळणे चांगले. कामाचा अतिरेक करू नका. चुकीच्या कामात वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमच्या महत्त्वाच्या कामावर अधिक लक्ष द्या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

धनु : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्‍हाला कोणतीही महत्त्वाची सूचना प्राप्त होऊ शकते. जुन्या समस्येवर उपाय मिळाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. तुमच्या योजना सार्वजनिक होऊ देऊ नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात सुसंवाद राखला जाईल.

मकर : श्रीगणेश सांगतात की, जीवनाला सकारात्मक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. चांगले यश अनुभवला. आत्मचिंतनामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल. कोणतीही कठीण कामे दृढ निश्चयाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. इतरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यास प्राधान्य द्या. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असे नवे करार तुम्‍हाला मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

कुंभ : कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद शुभ ठरेल. धार्मिक स्थळी गेल्याने तुम्हाला मन:शांती लाभेल. तुमच्यात नवीन ऊर्जा निर्माण कराल. आपल्या विचारांमध्ये संयम ठेवा. पैशाशी संबंधित कोणतेही व्यवहार टाळणे हिताचे ठरेल, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायात तुमच्या कामाचा दर्जा उत्तम राखण्याची गरज आहे.

मीन : आज कोणतेही अवघड काम तुम्ही तुमच्या मेहनतीने सोडवण्याचा प्रयत्न कराल, असे श्रीगणेश सांगतात. कौटुंबिक वादावर तोडगा काढल्यास घरात शांतता अनुभवाल. शेजाऱ्यांशी वाद टाळा. काहीवेळा शंकास्‍पद वागणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. जास्त कर्ज घेऊ नका. मुलांना योग्य मार्गदर्शनाचीही गरज आहे. व्यवसायाचे काम व्यवस्थित चालेल.

Back to top button