माझ्यावर हल्‍ला होऊ शकतो : जरांगेंनी व्यक्‍त केली भीती

file photo
file photo
Published on
Updated on

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा  मनाेज जरांगे हे आज (दि.३ मार्च)पासून धाराशिव आणि सोलापूरच्या दौर्‍यावर आहेत. या ठिकाणच्या विविध कार्यक्रमांना ते भेटी देणार आहेत. मी अंतरवालीतून बाहेर पडणार असून, माझ्यावर हल्‍ला होउ शकतो, अशी भीती जरांगे-पाटील यांनी माध्‍यमांशी बाेलताना व्‍यक्‍त केली.

यावेळी जरांगे म्‍हणाले की, आमच्या मागे शरद पवार आहेत, असा दावा करणारे उपमुख्‍यमंत्रीफडणवीस काल पुढे होऊन तुतारी वाजवायला गेले होते.  त्यांना आता आमच्या भिंतीवर पोम्प्लेट चिटकवायला यायचं नाही का? असा सवालही त्‍यांनी केला.

जरांगे पाटील आजपासून बीड, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होते. माझ्यावरती हल्ला घडवून आणण्याचा डाव आहे. आता मी बाहेर चाललो आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला सांगा मला अडवायला. फडणवीस यांचे कोणते कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतात तेही मला बघायचे आहेत, असेही ते म्‍हणाले.

मराठ्यांनी केसेसला तयार रहा. केस झाली की  कोर्टात  जामीन करुन घ्या. सर्व मराठा वकिलांची फौज तयार आहे. उद्यापासून पंतप्रधान पासून राष्ट्रपतीपर्यंत मराठ्यांवर अन्याय होत असल्याचे मेल पाठवायची महिम सुरु करा. कोणत्याही नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, असे पॉम्प्लेट दारावर चिटकवा. मराठ्यांच्या पोरांना पोलिसांनी ताब्‍यात घेतलं तर  अवघ्या तालुक्यातील मराठयांनी पोलीस ठाण्यात जाब विचारण्यासाठी जाऊन बसा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसभा निवडणुक हा माझा मार्ग नाही

लोकसभा निवडणुक हा माझा मार्ग नाही; पण समाजातील कुणी लढवत असेल तर मी समाजाचा मालक नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या विरोधात कोणकोण बोलतो ते आता मराठा समाज बघतो आहे.  मी आठ नऊ तारखे पर्यंत मजा बघतो मंग कामाला लागतो त्यांनी मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नये. सग्या सोयऱ्याची अमलाबजावणी करावी अन्यथा मराठ्यांशी गाठ असल्याचा इशाराही त्‍यांनी दिला.

आता डांबरी रस्त्यावर बॅलेट पेपर अंथरणार का?

बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत ३४०० उमेदवारांचे फॉर्म भरण्याची तयारी झाली आहे. आता डांबरी रस्त्यावर बॅलेट पेपर अथरणार का? आमच्या वावरात मतदान केंद्र टाकावं लागणार, असं म्हणत आता आमच्या वावरात येतात ते आम्ही बघतो, असा इशाराही त्‍यांनी दिला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news