मार्च महिन्यात शनीचा कुंभ राशीत उदय : ‘या’ राशींना अशुभ तर ‘या’ राशी होतील मालामाल | Saturn Rise in Aquarius 2024

मार्च महिन्यात शनीचा कुंभ राशीत उदय : ‘या’ राशींना अशुभ तर ‘या’ राशी होतील मालामाल | Saturn Rise in Aquarius 2024
Published on
Updated on

शनी ग्रहाला ज्योतिष शास्त्रात फार मोठे महत्त्व आहे. शनी हा सर्वांत मंदगती असणारा ग्रह आहे, त्यामुळे याचा प्रभावही दीर्घकाळासाठी राहातो. शनीला न्यायाचे आणि परिणामांचा देव मानले जाते. जर शनीची राशीत शुभस्थानी असेल तर त्याचा फार चांगला प्रभाव संबंधित व्यक्तीच्या जीवनावर दिसतो. अशा व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद आणि सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. पण या उलट शनी जर अशुभ स्थानी असेल तर संबधित व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी येतात. शनीचा १८ मार्च २०२४ ला सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी कुंभ राशीत उदय होत आहे. याचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होईल यांची ज्योतिष चिराग दारूवाला यांनी दिलेली ही माहिती. (Saturn rise in Aquarius 2024)

मेष – अचानक धनलाभाचे योग

ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा मेष राशीतील उदय हा ११ व्या स्थानी होत आहे. त्यामुळे आगामी काळ तुमच्यासाठी शुभ राहील आणि अडचणींतून सुटका मिळेल. तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि तुमची मोठी कामे यशस्वी होतील. नोकरदार व्यक्तींना नोकरीची फार चांगली संधी मिळणार आहे. तुम्ही केलेल्या कष्टाचे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सातत्याने सुधारणा होईल. कामाच्या निमित्ताने अचानक काही प्रवास करावा लागू शकतो.

वृषभ – कष्टाचे फळ मिळेल

वृषभ राशीच्या लोकांना शनीचा उदय शुभ आहे. जे लोक नोकरीत आहेत, त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल, तसेच तुम्हाला पदोन्नती मिळेल. कामामुळे तुमचा प्रभाव सहकाऱ्यांवर राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. अडकलेले पैसेही हाती येतील.

मिथुन – अडचणी कमी होतील | Saturn Rise in Aquarius 2024

मिथुन राशीसाठी शनीचा उदय नवव्या स्थानी होत आहे. या परिस्थितीत कारक योग होत आहे. तुमच्या अडचणी कमी होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, तुमच्या अडचणी कमी होतील. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी अनुभवाचा फायदा होईल. व्यापारातील लोकांना येथून पुढे चांगले लाभ होतील. कुटुंबीयांची चांगली मदत होईल.

कर्क – अडचणींत अचानक वाढ

शनीचा उदय कर्क राशीसाठी अशुभ आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी अडचणी अचानक वाढतील. तसेच व्यापारातही मोठे नुकसान होणार आहे. नोकरीत अनिश्चितता वाढेल. तुमच्या हातून फायदाच्या सौदा निसटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आपापसांतील नात्यांवर परिणाम होईल. कुटुंबात भांडणे आणि वादाची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित नुकसान होईल.

सिंह – व्यापारात नफा

शनीचा उदय सिंह राशीच्या सातव्या स्थानी होत आहे. अशा परिस्थितीत जे लोक व्यापारात आहे, त्यांना चांगला नफा मिळणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे आणि भाग्य तुमच्या बाजूने राहील. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना फार चांगला लाभ होईल.

कन्या – आर्थिक नुकसान

शनीचा उदय कन्या राशीसाठी अशुभ आहे आणि आर्थिक बाबतीत नुकसान होऊ शकते. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. या अशुभ काळात कोणतीही नवी सुरुवात करू नका. कुटुंबातील मतभेद टाळा. वैवाहिक जीवनात अडचणी येतील आणि प्रकृतीही खराब होईल. मित्रांसोबत संबंधही बिघडतील. या काळात फक्त तुमच्या कामावर लक्ष ठेवा आणि करिअर संदर्भात नवे निर्णय घेऊ नका.

तूळ – आर्थिक वृद्धी

शनीचा उदय तूळ राशीसाठी शुभ आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक वृद्धी होईल, त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. करिअरमध्ये फायदे होतील. तुम्ही जर नोकरीचा शोध घेत असाल तर तुम्हाला फार चांगली संधी मिळेल.

वृश्चिक – वाद वाढतील

वृश्चिक राशींच्या लोकांच्या अडचणीत वाढ होईल आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात वाद वाढतील. नोकरी आणि व्यापारात अडचणी येतील. पैशाशी संबंधित निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या.

धनू – सकारात्मक बदल

शनीच्या उदयामुळे धून राशींच्या लोकांना सकारात्मक बदल दिसतील. करिअरमध्ये प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वेळ चांगली आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. व्यापारातही सकारात्मक परिणाम दिसतील.

मकर – समस्या दूर होतील

मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनीच्या अस्तामुळे मकर राशीला मानसिक आणि शारीरिक त्रास झालेला आहे. पण शनीचा उदय तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होतील आणि चांगेल नातेसंबंध निर्माण होतील. काही प्रमाणात आर्थिक समस्याही सुटतील.

कुंभ – अशुभ परिणाम

शनीचा उदय कुंभ राशीसाठी अशुभ परिणाम देणारा आहे. तुमचे खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतील. त्यामुळे वायफळ खर्च टाळा आणि पैशांची बचत करण्याचा विचार करा. नोकरीच्या ठिकाणी विरोधक तुमच्याविरोधात कटकारस्थान रचतील. वाहन चालवताना काळजी घ्या. कामावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबीयांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, याची काळजी घ्या. नातेवाईंकासोबत आर्थिक देवाणघेवाण टाळा. या वेळी तुम्ही मालमत्तेत पैसे गुंतवावेत.

मीन – मालमत्ता खरेदीत यश

मीन राशीच्या लोकांना प्रेमजीवन आणि व्यवसायात ज्या अडचणी सुरू आहेत, त्या शनीच्या उदयानंतर म्हणजे १८ मार्चनंतर संपून जातील. घरी आनंदाचे वातावरण राहील. घरी नवा पाहुणा येईल. घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचारात असाल तर शनिदेव तुम्हाला यश देतील.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news