मार्चमध्ये २ वेळा शुक्र गोचर : ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, जाणून घ्या शुक्राच्या बदलत्या ‘चाली’चे परिणाम

मार्चमध्ये २ वेळा शुक्र गोचर : ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, जाणून घ्या शुक्राच्या बदलत्या ‘चाली’चे परिणाम

ज्योतिष शास्त्रानुसार ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह त्याची राशी बदलत असतो. मार्च महिन्यात सूर्य, मंगळ, शुक्र आणि बुध या चार ग्रह राशी बदलत आहेत. यातील शुक्र ग्रह ७ मार्च आणि ३१ मार्च असे दोन वेळा रास बदलत आहे. ७ मार्चला शुक्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. तर ३१ मार्चला शुक्र ग्रह पुन्हा एकदा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रह हा संपत्ती, प्रतिष्ठा, आनंदी वैवाहिक जीवन यांचा कारक मानला जात आहे. त्यामुळे शुक्र गोचरचा काही राशींना फार चांगला लाभ होणार आहे. १२ राशींना याचा काय लाभ होईल ते जाणून घेऊ. (Shukra Gochar)

मेष

मेष राशीच्या लोकांना शुक्र गोचरचा फार चांगला लाभ होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, नशिब तुमच्या बाजूने राहील. तुमच्या योजना प्रभावी राहतील. नोकरी, व्यवसायात पदोन्नती होईल, आणि वेतनवाढ होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील.

वृषभ

वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे शुक्राच्या राशीत होत असलेल्या परिवर्तनाचा लाभ करिअर आणि व्यापारातील प्रगतीसाठी होईल. या काळात वृषभ राशीला फार चांगले लाभ होतील.

मिथुन

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा संपत्तीचा कारक आहे, त्याचा मिथुन राशीला लाभ होतो. शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी आर्थिक आणि वित्तीय प्रगती घेऊन येईल.

कर्क

ज्या लोकांची रास कर्क आहे, त्यांच्यासाठी शुक्र ग्रह प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनसाठीचा ग्रह मानला जातो. त्यामुळे शुक्र ग्रहाचे होत असलेले राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांना प्रेमसंबंधसाठी शुभ आहे. कर्क राशीच्या लोकांचे नातेसंबंध चांगले आणि दृढ होतील.

सिंह

शुक्र गोचर सिंह राशीसाठी अतिशय लाभाचे सिद्ध होणार आहे, आणि त्यांना व्यवसायात मुबलक धनप्राप्ती होणार आहे. यापूर्वी जर तुम्ही शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला फार चांगले लाभ मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी शुभ ठरणार आहे. प्रेमसंबंध बळकट होतील, आणि तुम्ही जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे नियोजन कराल. कुटुंबात हुशारीने राहा.

कन्या

कन्या राशीसाठी शुक्र गोचर फार लाभाचा सिद्ध होईल. कामचा ताण कमी राहील, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जीवनात नवी ऊर्जा आणि आकांक्षा येतील. जीवनात सकारात्मक परिणाम दिसतील. या काळात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.

तूळ

तूळ राशीचा ग्रहस्वामी शुक्र मानला जातो. त्यामुळे या गोचरचा लाभ तूळ राशीला होईल. भौतिक सुखात वृद्धी होईल, बढती मिळेल. वडिलार्जित संपत्तीतून नफा होईल. मालमत्तेशी संबंधित वाद सुटतील आणि निर्णय तुमच्या बाजूने येईल. नव्या कामात यश येईल, सन्मान वाढेल. नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्यात चांगला लाभ मिळेल. नोकरीत अपेक्षित यश मिळेल.

वृश्चिक

शुक्र ग्रहाच्या होत असलेल्या राशी परिवर्तनामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येईल. या काळाता वृश्चिक राशीचे लोक मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करतील. घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा आईच्या या कामात मोठी मदत होईल. काही लोक घराचे नूतनीकरण, दुरस्ती करतील. शुक्राचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही अत्तरांचा वापर करावा.

धनू

शुक्र गोचरमुळे धनू राशींच्या लोकांच्या जीवनात आनंद येईल, आणि प्रेमजीवनातील काही बदलही तुमच्यासाठी आनंद घेऊन येतील. आर्थिक विषयांवर बोलायचे झाले तर तुम्हाला पैशांची कमतरता जाणवणार नाही. या काळात तुम्ही घर किंवा नवीन वाहन खरेदी कराल. ज्यांची प्रकृती खराब आहे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. तुमच्या चांगल्या कामामुळे बढतीचे योग आहेत.

मकर

शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत आहे, याचा मकर राशीला लाभ होईल. करिअरमध्ये सकारात्मक वाढ होईल. तुमची कल्पकता वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठाची मदत होईल. वेतनात वाढ होईल आणि इतर लाभही मिळतील. आर्थिक स्थैर्य लाभेल

कुंभ

कुंभ राशीसाठी शुक्र गोचर शुभसंयोग घेऊन येत आहे. तुम्हाला प्रत्येक कामात लाभ होईल. तुमच्या आवडीच्या जागी बदली होईल. तुमच्या जीवनातील अनेक समस्या नाहीशा होतील. कुटुंबीयांकडून सर्वोतोपरी मदत होईल.

मीन

शुक्र गोचरमुळे मीन राशीसाठी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होईल. अनावश्यक धावपळ होईल. या महिन्यात तुमचे अनावश्यक खर्च वाढतील. मानसिक ताण आणि अस्वस्थता जाणवेल. भावाकडून काही विषयांवर अनावश्यक ताण राहील. काही कारणांमुळे मानसिक ताण वाढेल.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news