गेवराई ; पुढारी वृत्तसेवा सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. काल (रविवार) जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आज (सोमवार) पहाटे पासून पोलिस प्रशासनाने आढावा घेऊन गेवराई आगारातील बस सेवा बंद केल्या आहेत. अचानक बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. मात्र खासगी वाहतूकदारांची चांदी झाल्याचे दिसून आले. गेवराई बस स्थानकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान जरांगे यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय स्थगित केला आहे. त्यांनी मराठा आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. जरांगे यांनी पुन्हा उपोषण स्थळावरच बसून पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितल आहे.
हेही वाचा :