जळगाव : चाळीसगावमध्ये सव्वा दोन लाखाची घरफोडी | पुढारी

जळगाव : चाळीसगावमध्ये सव्वा दोन लाखाची घरफोडी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
चाळीसगाव तालुक्यातील पाथर्जे गावातील घराचे कुलूप तोडून चोरट्याने दोन लाख 25 हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पाथर्जे या गावात शेती करणाऱ्या सुमनबाई मोरुसिंग चव्हाण यांचे राहते घर आहे. त्या घरात नसताना  चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून 15 ग्रॅमचे दोन सोन्याचे नेकलेस, दहा ग्रॅमची सोन्याची साखळी, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, चांदीच्या तालाजीत ताडबंद, पन्नास भाराचे 70 हजार रुपये असा दोन लाख 25 हजार घेऊन चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोकेश पवार पुढील तपास करीत आहेत.

Back to top button