Onion Export News | ५४ हजार टन कांदा निर्यातीस परवानगी | पुढारी

Onion Export News | ५४ हजार टन कांदा निर्यातीस परवानगी

नाशिक (लासलगाव): पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने बांगलादेश, मॉरिशस, बहारीन, भूतान या देशांना सुमारे 54,760 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली व्यापाऱ्यांना 31 मार्चपर्यंत या निर्यात करण्याची परवानगी आहे. परंतु याबाबतची अधिसूचना अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नसल्याने संभ्रमावस्था आहे. (onion export ban)

सरकारने 22 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांना 31 मार्चपर्यंत चार देशांना 54,760 टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली. बांगलादेशला 50,000 टन, मॉरिशसला 1,200 टन, बहारीनला 3,000 टन आणि भूतानला 560 टन कांदा निर्यात केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी पीटीआयला सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाच्या (Ministry of External Affairs) शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सिंग म्हणाले. (onion export ban)

सरकारकडून 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि भाववाढ रोखण्यासाठी 8 डिसेंबर 2023 रोजी ही बंदी लागू करण्यात आली होती. निर्यातबंदी हटविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे., दरम्यान, आज येथील बाजार समितीत कांद्याची ८१९ वाहनांमधून १४०२० क्विंटल आवक होऊन किमान 600 कमाल 1600 तर सरासरी 1451 रुपये भाव मिळाले. (onion export ban)

Back to top button