पोलिस बनून बहिणीला कॉपी पुरवायला आला अन् गजाआड झाला | पुढारी

पोलिस बनून बहिणीला कॉपी पुरवायला आला अन् गजाआड झाला

अकोला : बारावी परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला अकोला जिल्ह्यातील पातूर येथील एका परीक्षा केंद्रावर अजबच प्रकार घडला. पोलिसांचा गणवेश धारण करून कॉपी पुरवताना तोतया पोलिस मिळून आला. पातूरच्या पोलिस निरीक्षकांनी बुधवारी (21 फेब्रुवारी) त्याला अटक केली.

पोलिस निरीक्षक किशोर शेळके पथकासह परीक्षा केंद्रावर गेले होते. या वेळी अनुपम मदन खंडारे (24, रा. पांगराबंदी) हा युवक पोलिसांचा गणवेश परिधान करून पॉकेटमधून कॉपी पुरविताना दिसला. शेळके यांना पाहून त्याने सॅल्यूट केलं. मात्र सॅल्यूट करण्याची पद्धत योग्य नव्हती. गणवेशावरील नेमप्लेटही चुकीची होती. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. झडती घेतली असता त्याच्या खिशात इंग्रजी भाषेची प्रत सापडली. तो बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी तोतया पोलिस बनल्याचे समोर आले.

Back to top button