जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोचिन विमानतळावर | पुढारी

जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोचिन विमानतळावर

कोची ः पुढारी वृत्तसेवा : हरित ऊर्जानिर्मितीत कोचिन इंटरनॅशनल विमानतळाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. जगातील पहिले ग्रीन हायड्रोजन प्रकल्प केंद्र विमानतळावर उभारण्यात येणार आहे. असे इंधन केंद्र असलेले कोचिन पहिले विमानतळ ठरणार आहे.

संबंधित बातम्या 

कोचिन विमानतळ व्यवस्थापन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) याबाबतचा परस्परसामंजस्य करार केला. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. भविष्यातील ऊर्जा म्हणून हायड्रोजनकडे पाहिले जाते. शून्य कार्बन उत्सर्जन करणारे इंधन म्हणून याला प्राधान्य दिले जात आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या उपस्थितीत तिरुअनंतपुरम येथे करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

कोचिन विमानतळाने हरित ऊर्जेत आघाडी घेतली आहे. सौरप्रकल्प आणि हायडेल स्टेशनद्वारे 50 मेगावॉट वीज निर्माण केली जात आहे. दररोज सरासरी दोन लाख युनिट वीजनिर्मिती याद्वारे होत आहे. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. भविष्यातील ऊर्जा म्हणून हायड्रोजनकडे पाहिले जाते

Back to top button