जरांगेंचे सलग चौथ्‍या दिवशी उपोषण सुरू; प्रकृती खालावली, उपचारास नकार | पुढारी

जरांगेंचे सलग चौथ्‍या दिवशी उपोषण सुरू; प्रकृती खालावली, उपचारास नकार

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा उपोषणाच्या चौथ्या दिवशीही मनोज जरांगे पाटील यांनी उपचारासाठी नकार दिला आहे. आज (मंगळवार) सकाळी जालना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नेतृत्वाखालील पथक मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी आले होते. या डॉक्टरांच्या पथकाने मनोज जरांगे यांच्याकडे आरोग्य तपासणीसाठी आग्रह केला. पाटील तपासणी करू द्या, उपचार घेवू नका पण तपासणी तरी करू द्यावी अशी विनंती केली. मात्र आधी सरकारला सगे सोयरे कायदा करा, त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे यांनी डॉक्टरांच्या पथकाकडे केली. त्यानंतर हे डॉक्टरांचं पथक माघारी फिरले.

सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उठता, बसताही येत नाही. आवाजही त्यांचा खोल गेला आहे. उपोषणा दरम्यान पाणी, अन्न घेणार नाही असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button