Market Update : मटार, राजमा, मिरचीच्या दरात वाढ; पालेभाज्या स्वस्त | पुढारी

Market Update : मटार, राजमा, मिरचीच्या दरात वाढ; पालेभाज्या स्वस्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मटार, राजमा आणि मिरचीची आवक घटल्याने दरात वाढ झाली तर कोथिंबीर, मेथी, पालक आदी पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. तसेच बाजारात नव्या लसणाची आवक झाल्याने काही प्रमाणात दर घटल्याने ग्राहकांना समाधान
मिळाले आहे. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईमधील किरकोळ बाजारात मटार, राजमा आणि मिरचीच्या दरात 20 ते 25 रूपयांनी वाढ होऊन 70 ते 80 रूपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तर राजस्थान येथून नव्या लसणाची बाजारात आवक बाजारात झाल्याने चारशे रूपये प्रतिकिलो असलेल्या लसणाचे दर 300 ते 350 रूपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. तर पालेभाज्यांची प्रति पेंडी दहा रूपये प्रमाणे विक्री होत आहे.

मोशी उपबाजारातील घाऊक दर ः (प्रतिकिलो)

मटार 35 ते 40, राजमा 35, मिरची 40, लसूण 200, भेंडी 65 ते 70, गवार 70 ते 90, गाजर 25 ते 30, वांगी 50 ते 60, शेवगा 70 ते 80, काकडी 15 ते 20, कांदा 15 ते 20, बटाटा 12 ते 15, टोमॅटो 15 ते 20, आले 65 ते 70 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.

मोशी उपबाजारातील आवक ः (क्विंटल)
मटार 339, राजमा 200, मिरची 129, लसूण 22, बटाटा 983, आले 31, गाजर 202, गवार 7, शेवगा 23, टोमॅटो 398, काकडी 184, भेंडी 60 क्विंटल एवढी आवक झाली आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 45300 गड्डी, फळे 770 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3820 क्विंटल एवढी आवक झाली.

 

Back to top button