Nashik Murder News | रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खून | पुढारी

Nashik Murder News | रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खून

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून शंकर गाडगीळ (३८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, चुंचाळे घरकुल योजना भागात शनिवारी, दि.10 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षाचालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन यांनी शंकर गाडगीळ (३८) याच्या डोक्यात दंडूका मारल्याने गंभीर जखमी झाली. त्यानंतर जखमी गाडगीळ याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले आहे. याप्रकरणी चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार, पोलिस हवालदार ढाकणे व पथक यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ संशयित रिक्षाचालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन या तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मयत व संशयित आरोपी हे चुंचाळे घरकुल भागात राहणारे आहेत. गाडगीळ व कांबळे दोघे ही रिक्षाचालक आहेत. तर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत.

Back to top button