PM Lunch With MPs: PM मोदींनी भाजपसह, विरोधी पक्षातील खासदारांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला

PM Lunch With MPs
PM Lunch With MPs

पुढारी ऑनलाईन डेस्क: अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पीएम मोदी अचानक संसदेच्या कॅन्टीनमध्ये आले. यावेळी येथे भाजपसह, इतरही पक्षांचे देखील खासदार हजर होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'चला तुम्हाला शिक्षा देतो…' असे म्हणत खासदारांना कॅन्टीनमध्ये नेले. यावेळी त्यांनी भाजपसह, विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत आज शुक्रवारी (दि.९) दुपारी भोजनाचा आस्वाद घेतला.   या वेळचे फोटो एएनआयने शेअर केले आहेत. (PM Lunch With MPs)

यावेळी संसद कॅन्टीनमध्ये पीएम मोदी यांच्यासह भाजप आणि विरोधी पक्षातील आठ खासदार त्यांच्यासोबत होते. यामध्ये भाजप खासदार हीना गावित, एस. फांगनॉन कोन्याक, तेलुगू देशम पक्षाचे खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार रितेश पांडे आणि बिजू जनता दलचे खासदार सस्मित पात्रा हे होते. यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी आज दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. पंतप्रधान मोदींनी खासदारांसह संसदेच्या कॅन्टीनमध्ये शाकाहारी जेवण आणि नाचणीचे लाडूही खाल्ले आहे. (PM Lunch With MPs)

PM Lunch With MPs: 'चला तुम्हाला शिक्षा देतो…'- पंतप्रधान मोदी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आठही खासदारांसोबत जेवण करण्यापूर्वी पंतप्रधान म्हणाले की, चला तुम्हाला शिक्षा देतो. यानंतर पीएम मोदी यांनी सर्वांना सोबत घेऊन संसद भवनाच्या कॅन्टीनमध्ये गेले. जिथे त्यांनी सर्वांसोबत जेवण केले. या काळात पंतप्रधानांनी सर्वांसोबत शाकाहारी भोजन केल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news