पैसे कमी दिल्याने ठाकरेंनी मला मंत्रीपद दिलं नाही : दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

पैसे कमी दिल्याने ठाकरेंनी मला मंत्रीपद दिलं नाही : दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : मातोश्रीमधून माझ्याकडे मंत्री पदासाठी कोट्यावधी रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र मी एक कोटी रुपये दिले. कमी पैसे दिले म्हणून मला मंत्री पद मिळू शकले नाही असा गौप्यस्फोट राज्याचे शालेय शिक्षण व मराठी  भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी येथील संवाद कार्यक्रमात केलेल्या आरोपांचे खंडन करत केसरकर म्हणाले, 50 कोटीच काय एक रुपया जरी घेतला असल्याचे सिद्ध केल्यास तर राजीनामा देईन असे सांगितले. मंत्री पद देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे कोट्यावधी रुपयांची मागणी केली होती, मात्र एकनाथ शिंदे यांनी एक रुपया न घेता मंत्रीपद दिले असल्याचा गौप्यस्फोट केसरकर यांनी केला.

मी अनेक पक्ष नेत्यांसोबत काम केले आहे, उद्धव ठाकरे यांचा मी मान ठेवला होता मात्र त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन माझ्या विरोधात आरोप केले. साईबाबांच्या श्रद्धा, सबुरी बद्दल ते बोलले हे चुकीचे असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले. नारायण राणे हे सिंधुदुर्ग वासियांसाठी देव होते. त्यावेळी तुमच्या गाडीत भरायला पेट्रोल आणि राहण्यासाठी हॉटेल मिळत नव्हते तर श्याम सावंत सोडले तर त्यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार त्यांनी पुन्हा निवडून आणले आणि त्यांच्यावर तुम्ही टीका करता हे चूकीचे असल्याचेही ते म्हणाले.

नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष एक नंबरला होता तर दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तीन नंबरला शिवसेना होती या शिवसेनेकडे चाळीस हजार मते होती मात्र हे मताधिक्य आपण एक लाख वीस हजार पर्यंत आणले यामध्ये खारीपेक्षाही मोठा वाटा माझा होता हे त्यांनी कबूल करावे .तुमचे आमदार खासदार निवडून आणण्यासाठी  माझा जास्त वाटा असल्याचे ते म्हणाले.

आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या मुख्यमंत्र्यावरील रकमेबाबत बोलताना ते म्हणाले जर कोट्यावधी रुपये दिले होते तर ते यापूर्वी गणपत गायकवाड यांनी का मागितले नाही. जेव्हा त्यांना अटक झाली तेव्हा हे बिनबुडाचे आरोप केले जात  असून यात काही तथ्य नसल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे हे माझ्यासारख्या सज्जन माणसाच्या अंगावर जात असून हे येथील जनता कधीही सहन करणार नाही. त्याचबरोबर कोकणातील दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन त्यांचा अवमान करत आहेत. तुम्ही घेतलेले निर्णय शरद पवार यांच्या सांगण्यावरून घेतले त्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली असल्याचे केसरकर म्हणाले. माझी लढाई नारायण राणे यांच्याशी व्यक्तिगत  नसल्यामुळे आमचे दोघांचे एकमेकांशी जुळले आहे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news