file photo
file photo

खारघरमधून नायजेरियन व्यक्तीकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त

Published on

पनवेल ः पुढारी वृत्तसेवा : गुन्हे शाखा पोलिसांनी खारघर येथून 52 ग्रॅम एमडी जप्त केली आहे. याप्रकरणी एका नायजेरियन व्यक्तीला अटक करून त्याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या 

खारघर परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. यामध्ये एका संशयित नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यामध्ये त्याच्याकडे 52 ग्रॅम एमडी हा ड्रग्ज आढळून आला.

बाजारभावानुसार त्याची किंमत 5 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. अधिक चौकशीत त्याचे नाव गिडिओन इझे असून तो तळोजाचा राहणारा असल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news