Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan - 2024 | मान्यवरांचे झाले आगमन | पुढारी

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan - 2024 | मान्यवरांचे झाले आगमन

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ झाला असून मान्यवरांचे आगमन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गुलाबराव पाटील, अनिल पाटील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास यंदा आकर्षक अशा चॅटबोटचा वापर करण्यात आला असून याव्दारे मोबाईलवरुन संमेलनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा, कोणते कार्यक्रम होणार आहेत याबाबत सविस्तर माहिती मिळत आहे. चॅटबोट च्या माध्यमातून व्हॉट्सॲप क्रमांक सेव्ह करून थेट संमेलनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत.

तर असे कनेक्ट व्हा संमेलनासोबत…

  • ९५२९२१६३५५ हा मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा
  • या क्रमांकवर नमस्कार, हाय किंवा हॅलो असा मेसेज करा.
  • त्यानंतर तुम्हाला पर्यांयापैकी योग्य पर्याय निवडा.’ असा मेसेज येईल.
  • त्यात खाली दिलेल्या मेनूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साहित्य संमेलनाशी निगडित प्रश्नांची यादी मिळेल.
  • कोणताही प्रश्न निवडल्यास त्याचे उत्तर तात्काळ तुमच्या मोबाईलवर पाठविण्यात येईल.

तर २ फेब्रुवारी कार्यक्रम याप्रमाणे आहेत.
दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलानाची सुरुवात सकाळी ७.३० वा. ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर स.१०.३० वा. उद्घाटन समारंभा आधी ध्वजारोहण व ग्रंथ दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. दु.२ वा. बालसाहित्य संमेलनातील निवडक कार्यक्रमाचे सादारीकरण होईल. दु.३.३० वा. मुख्य सभागृहात होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे, राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय संध्याकाळी ५.३० वा. कविसंमेलन होईल. रात्री ८.३० वा. स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या सभागृहात दु. २.३० वा. कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक या विषयावर परिसंवाद होईल. दु. ३.३० वा. शासकीय परिसंवाद सादर होईल. संध्या. ५ वा. स्थानिक वक्ते स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान या विषयावर भाषण करणार आहेत.

Back to top button