

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वसंतराव नाईक चौकात गुरुवारी सकाळी जालन्याकडे जाणारा भरधाव गॅस टँकर दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सिडको एन-3, एन-4, एन-5 परिसरातील सर्व शाळा व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उप जिल्हादंडधिकारी जनार्दन विधाते यांनी दिले असून, परिसरात कलम 144 लागू केले आहे.
जालना रोड वसंतराव नाईक चौक उड्डाणपुलाजवळ एन-4 सिडको येथे गुरुवारी सकाळी एचपी कंपनीच्या गॅस टँकरला अपघात झाला. या गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असून, हा गॅस हवेमध्ये पसरलेला आहे व पसरत आहे. आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात.