Uddhav Thackeray : मोदींची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी करणारे निर्बुद्ध : उद्धव ठाकरे | पुढारी

Uddhav Thackeray : मोदींची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी करणारे निर्बुद्ध : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये एकतरी साम्य दाखवा, असे आव्हान करून मोदींची तुलना महाराजांशी करणारी माणसे निर्बुद्ध आहेत. तुम्ही मोदींना देव माना, आमची काहीही हरकत नाही, पण मोदींची तुलना शिवरायांशी करू नका, असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते रायगड जिल्ह्यातील पेण येथे आज (दि.१) जाहीर सभेत बोलत होते. Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, १० वर्षात मोदी सरकराने केलेल्या कामाचा आढावा घ्या. आणि मोदी यांनी १० वर्षा मारलेल्या थापा घरघरात पोहोचवा. रायगडमधील चक्रीवादळाच्या संकट अडक लेल्या नागरिकांना आमचे सरकार असताना आम्ही मदत केली. परंतु, मोदी रायगडमध्ये आले का ? रायगडमध्ये माणसेच राहतात. मग मोदी का आले नाहीत?, असा सवाल ठाकरे यांनी केला. Uddhav Thackeray

आता फुकट गॅस देतील, निवडणुकीनंतर किंमती वाढवतील, मते मिळेपर्यंत मेरे प्यारो देशवासियों असे म्हणतात. नंतर मतदारांना ओळखही दाखवत नाहीत. आता मतदारोंना जागे व्हा, जादू दाखविणाऱ्यांना भुलू नका, रायगडमध्ये मोदीविरोधात त्सुनामीप्रमाणे मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला पुन्हा येथे येण्याची मला गरज वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब की बार ४०० पार अशी घोषणा करणाऱ्यांना नितीशकुमार का लागत आहेत. भ्रष्टाचारांना क्लीन चीट देऊन भाजपमध्ये घेणे, हीच मोदी गॅरंटी आहे. ही अशी मोदी गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का ? आता भाजपला मते दिली तरी पुढच्या पिढ्या हुकुमशाहीत अडकतील, अशी भीती ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. कल्याण आणि कोकणात गद्दारांची घराणेशाही आहे. गद्दारांच्या घराणेशाहीचा मोदींनी बिमोड करावा,असा खोचक सल्लाही ठाकरे यांनी दिला.

हेही वाचा 

Back to top button