Maratha Morcha Update : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कोंडी नाही ; मोर्चेकरी शिस्तबध्द  | पुढारी

Maratha Morcha Update : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कोंडी नाही ; मोर्चेकरी शिस्तबध्द 

आनंद पवार

पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे-पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मराठा मोर्चा आत्ता लोणावळा-खंडाळा मार्गे खोपोलीच्या दिशेने शिस्तबद्धपणे निघाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कुठलीही वाहतूक कोंडी नजरेत आलेली नाही. द्रुतगती मार्गावरून लोणावळा आणि खंडाळ्याकडे उरणाऱ्या सर्व मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले असून हे मार्ग तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत. घाटाच्या रस्त्यावर काही मोर्चेकरी व ताफ्यातील काही चारचाकी गाड्या, विशेषतः लहान टेम्पो व छोटे ट्रक, शिस्तबद्धरीतीने एकाच मार्गिकेतून पुढे सरकताना दिसत आहेत. काही ठिकाणी मोर्चेकरी घाटातील पाण्याच्या जागी थांबून आवरताना दिसून आले तर काही मोर्चेकरी चालू वाहनांमधूनच न्याहारी करत असल्याचे चित्र दिसले.

पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी दिसत नसली तरी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या घाटातील रस्त्यावर अमृतांजन पूल व लोणावळा एक्सिट परिसरात नित्याची वाहतूक कोंडी दिसून आली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मात्र वाहतूक सुरळीत सुरू आहे याबाबत घाट सुरळीतपणे उररून खालापूर परिसरात पोहोचलेल्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button