मेष : जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ घालवाल.
वृषभ : वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज. सहकार्यांना प्रोत्साहित करून परिश्रम करायला भाग पाडावे लागेल.
मिथुन : आरोग्य चांगले राहील. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल; पण गरजेच्या कामामुळे त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही.
कर्क : कुटुंबातील सदस्यांना जीवनात विशेष स्थान असेल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे.
सिंह : विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसाल.
कन्या : कामाबाबत आणि द़ृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले द़ृढनिश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
तूळ : तुम्ही दिवसभर चिंतेत राहाल. व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. क्षुल्लक वाद विसरून जा.
वृश्चिक : तुमच्याजवळील समजूतदारपणाची गोड फळे मिळतील. घाईने घेतलेल्या निर्णयांमुळे दबाव येणार नाही, याची काळजी घ्या.
धनु : तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. प्रलंबित देणी परत मिळवाल. कौटुंबिक बंधन, कर्तव्ये विसरू नका. मनोबल चांगले राहील.
मकर : प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा.
कुंभ : संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की, तुम्ही किती वेळ वाया घालवला. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.
मीन : घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. मनःशांती लाभेल.
– ज्यो. मंगेश महाडिक