Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, ३ जानेवारी २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, ३ जानेवारी २०२४

मेष ः इतरांवर खर्च करणे टाळा. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. मनशांती लाभेल.

वृषभ ः सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस. जोडीदार आज तुम्हाला आश्चर्याचा धक्का देण्याच्या तयारीत असेल.

मिथुन ः आजचा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असेल. आजच्या दिवशी तुम्ही चांगली योजना भविष्यासाठी बनवू शकता. आर्थिक आवक चांगली.

कर्क ः घरच्या आघाडीवर अडचण संभवते. त्यामुळे जे बोलाल, ते नीट विचार करून बोला; अन्यथा अडचणीत येऊ शकता.

सिंह ः इतर दिवसापेक्षा आजचा दिवस आर्थिक द़ृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला धन प्राप्ती होईल. काही खरेदी करण्याचा मूड बनेल.

कन्या ः आपल्यावर प्रेम करणार्‍या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. तुमचा जोडीदार प्रामाणिकच राहील. मन प्रसन्न राहील.

तूळ ः अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने निराश व्हाल.

वृश्चिक ः रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. मनोबल चांगले राहील.

धनु ः आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा लागेल.

मकर ः आज तुम्हाला तुमच्या क्षेत्रात भरपूर संधी मिळणार आहेत. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामांचे नीट नियोजन करा.

कुंभ ः कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणे वावरा. कोणावरही टीका करू नका.

मीन ः मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो.

Back to top button