Weather update : उत्तरेतील राज्ये गारठली तर दक्षिणेला पावसाने झोडपलं

Weather Update
Weather Update

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातून शीतलहरी, तर दक्षिणेकडून बाष्पयुक्तवारे यांचा संगम महाराष्ट्रावर होत असल्याने राज्यात किमान तापमानात फार घट झालेली नसतानाही उत्तररात्र ते पहाटेपर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. सोमवारी तामिळनाडूतील थुथुकुडी गावात 950 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस 24 तासांत झाला आहे. उत्तरेकडील राज्ये गारठली असून, पंजाब, हरियाणा, चंडीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि वायव्य राजस्थान, पूर्व-मध्य भारताच्या काही भागांमध्ये किमान तापमान 5 ते10 अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. त्यामुळे त्या भागात दाट धुके अन् कडाक्याची थंडी आहे. तमिळनाडू राज्यातील थुथुकुडी येथे तब्बल 950 मिलिमीटर तर तिरुनेलवेली येथे 620 मिलिमीटरची नोंद झाली आहे.

लक्षद्वीपमध्ये चक्रीय स्थिती..

लक्षद्वीप बेटांवर वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाल्याने कोमोरिन परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे, त्यामुळे पुन्हा वादळी वारे सुरू झाल्याने समुद्र खवळणार आहे.

पुढील पाच दिवस कडाका कायम

उत्तर भारतात पुढील पाच दिवस कडाक्याच्या थंडीसह दाट धुके राहणार आहे. तर दक्षिण भारतात पाऊस सुरूच आहे. त्या दोन्ही वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होत आहे. दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे तर उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींची टक्कर राज्यात होत आहे. त्यामुळे किमान तापमानात फार वाढ झालेली नसतानाही थंडीचा कडाका कायम

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news