6G Technology in India : देश 6G युगाची तयारी करत आहे – PM मोदी

6G Technology in India
6G Technology in India
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : 6G Technology in India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान घोषणा केली की देश 6G युगाची तयारी करत आहे. यावेळी त्यांनी भारताच्या मोबाइल डेटा योजना आणि इंटरनेट सेवांच्या यशावर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदी यांनी 6G विषयी माहिती देताना सांगितले की, 5G पेक्षा 6G 100 पट वेगवान असण्याची अपेक्षा आहे आणि फॅक्टरी ऑटोमेशन, स्वायत्त वाहने आणि आभासी वास्तविकता यासह विविध उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणेल, भौतिक आणि डिजिटल जगांमधील रेषा अस्पष्ट करेल.

भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देश लवकरच 6G युगात (6G Technology in India) प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधानांनी पुढे अधोरेखित केले की, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याबरोबरच जागतिक स्तरावर काही सर्वात स्वस्त मोबाइल डेटा योजना आणि इंटरनेट सेवा प्रदान करतो.

पंतप्रधान मोदींनी पुढे अधोरेखित केले की देशाने 5G चे सर्वात जलद देशव्यापी रोलआउट साध्य केले आहे. त्याचप्रमाणे आता भारत 5G वरून 6G वर झटपट बदल करण्याच्या दिशेने काम करत आहे. यासाठी आम्ही एक 6G टास्क फोर्स तयार केला आहे. जसजसे भारत 5G सक्षम झाला आहे, तसतसे सरकार हळूहळू परंतु स्थिरपणे 6G सुरू करण्याकडे आपले लक्ष केंद्रित करत आहे आणि यावर काम आधीच सुरू झाले आहे.

आता सध्या भारत 5G युगात आहे. 5G चे तंत्रज्ञान प्रचंड सुपर-फास्ट आहे. सध्या 5G 10 गीगाबिट प्रति सेकंद पर्यंत वेगाने पोहोचू शकतो. मात्र, 6G हे 5G पेक्षा अधिक सुपर-डुपर फास्ट असणार आहे. नावाप्रमाणेच 6G हे 5G च्या पुढची पायरी आहे. 6G इंटरनेट हे 5G इंटरनेपेक्षा 100 पट वेगवान होणार आहे. 5G 10 गीगाबिट प्रति सेकंद पर्यंत वेगाने पोहोचू शकतो, तर 6G प्रति सेकंद आश्चर्यकारकरित्या 1 टेराबिट पर्यंत जाऊ शकतो.

6G Technology in India : 5G आणि 6G मध्ये हा असणार आहे फरक?

6G चा वेग हा प्रचंड असणार आहे. फक्त एका मिनिटात तुम्ही 100 चित्रपटांइतका प्रचंड डेटा डाऊनलोड करण्यात 6G सक्षम असणार आहे. याशिवाय 6G आम्हाला "डिजिटल ट्विन्स" सारख्या गोष्टींसह डिजिटल जगाच्या जवळ आणेल. त्यामुळे आभासी जग हे आणखी सूपर कूल होलोग्रामसारखे होईल. आभासी जग अधिक वास्तविक वाटेल. इतके की आभासी जग आणि वास्तविक जगात काहीही फरक वाटणार नाही. इतकेच नाही आभासी जग पूर्णपणे खरेखुरे वाटेल.

6G हे जमीन आणि आकाश दोन्हींमध्ये कार्य करू शकते. 5G तंत्रज्ञान हे करू शकत नाही. थोडक्यात तुम्ही 6G तंत्रज्ञान तुम्हाला तुम्ही विमानात असताना जमिनीवर असणाऱ्यासह संपर्क करू शकतात. 6G हे भिन्न तंत्रज्ञान वापरू शकते.

6G मुळे असंख्य मशीन्स आणि गॅझेट्स एकमेकाशी जोडले जातील. 6G चे आगमन आपल्या भौतिक वास्तव आणि डिजिटल क्षेत्रामधील रेषा अस्पष्ट करेल.

आपल्या जगण्याच्या आणि तंत्रज्ञानाशी संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये खरोखर क्रांती घडवून आणेल.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news