Sensex @70000 : भारताच्या निर्देशांकातील 10 हजार ते 70 हजारपर्यंतचे प्रमुख टप्पे

Sensex @70000 : भारताच्या निर्देशांकातील 10 हजार ते 70 हजारपर्यंतचे प्रमुख टप्पे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : BSE सेन्सेक्सने आज (दि. 11) 70,057.83 चा सर्वकालीन उच्चांकाला स्‍पर्श केला. सेन्‍सेक्‍सला 60 हजार ते 70 हजारपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्‍यास सुमारे एक वर्ष 5 महिन्‍यांचा कालावधी लागला आहे. 24 सप्‍टेंबर 2021रोजी सेन्‍सेक्‍सने 60 हजारांचा टप्‍पा गाठला होता. जाणून घेवूया सेन्‍सेक्‍सचा दहा हजारांनी वाढलेल्‍या टप्‍प्‍यांविषयी…

60 हजारांहून 70 हजारांचा टप्‍पा ओलांडण्‍यास लागला 1.5 वर्षांचा कालावधी

60,000 ते 70,000 पर्यंतच्या प्रवासाला 548 दिवस किंवा 1.5 वर्षांचा कालावधी लागला जो 30-स्टॉक एक्स्चेंजने 10,000 पॉइंट्सच्या पुढे जाण्यासाठी दुसरा सर्वात कमी आहे. 24 सप्टेंबर 2021 रोजी सेन्सेक्सने 60,000 चा टप्पा गाठला होता.

30 हजारांचा टप्‍पा ओलांडण्‍याचा प्रवास सर्वात प्रदीर्घ

भारतात सेन्‍सेक्‍स 20 हजारांहून 30 हजारांवर जाण्‍याचा प्रवास हा सर्वात प्रदीर्घ ठरला आहे. 20 हजारांहून 30 हजारांचा टप्‍पा ओलांडण्‍यास सेन्‍सेक्‍सला 2,318 दिवस म्‍हणजे सुमारे 6.35 वर्षांचा कालावधी लागला. 26 एप्रिल 2017 रोजी सेक्‍सेक्‍स 30,000 चा टप्पा गाठला.

सेन्‍सेक्‍सने 30 हजारांहून 40 हजारांचा टप्‍पा हा सर्वात कमी म्‍हणजे केवळ 520 दिवसांमध्‍येच पूर्ण केला होता. 3 जून 2019 रोजी सेन्सेक्सने हा टप्पा गाठला. त्‍या दिवशी सेन्‍सेक्‍स 40,267.62 वर स्‍थिरावला होता.

7 फेब्रुवारी 2006 रोजी 20 हजार पार

7 फेब्रुवारी 2006 रोजी सेन्सेक्सच्या 10,000 ते 11 डिसेंबर 2007 रोजी 20,000 पर्यंतच्या प्रवासाला 463 दिवस म्‍हणजे सुमारे 1.3 वर्षे लागली, तर 40,000 ते 50,000 पर्यंतचा टप्‍पा पूर्ण करण्‍यासाठी 416 दिवस म्‍हणजे 1.14 वर्षे लागली. 3 फेब्रुवारी 2021 रोजी सेन्सेक्स 50 हजारांचा आकडा पार केला होता.

50 हजारावरुन 60 हजारांचा आकडा सर्वात कमी वेळेत गाठला

50,000 ते 60,000 पर्यंत सर्वात वेगवान 10,000 अंकांची वाढ होती. यासाठी केवळ 158 दिवस लागले. 24 सप्टेंबर 2021 रोजी सेक्‍सेक्‍स 60,048.47 वर स्‍थिरावला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news