लसणाचे दर आवाक्याबाहेर ; प्रतिकिलो चारशे रुपयांपर्यंत दर | पुढारी

लसणाचे दर आवाक्याबाहेर ; प्रतिकिलो चारशे रुपयांपर्यंत दर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बाजारात लसणाची आवक घटल्याने उपलब्ध मालाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे लसणाच्या दरात वाढ होऊन प्रतिकिलो साडेतीनशे ते चारशे रुपयांनी विक्री होत आहे. तर ढगाळ वातावरणामुळे काकडी आणि गवारची आवक घटली असून, दरात वाढ झाली. मात्र पालेभाज्या स्वस्त असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. जानेवारी महिन्यांत लसणाच्या मालाची आवक होईल. तोपर्यंत लसणाचे दर तेजीत राहतील, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईमतील किरकोळ बाजारात काकडी प्रतिकिलो 80 रुपयांहून अधिक तर गवारचे दर 100 रुपये प्रतिकिलो आहेत. तसेच कोथिंबीर, पालक, मेथी आदी सर्व पालेभाज्यांच्या जुडी 15 ते 20 रुपये दराने विक्री होत आहेत.

मोशी उपबाजारातील घाऊक दर ः (प्रतिकिलो)
शेवगा 60 ते 65, काकडी 20 ते 30, भेंडी 40 ते 50, गवार 55 ते 60, कांदा 25 ते 30, बटाटा 10 ते 14, टोमॅटो 15 ते 20, आले 70 ते 80, लसूण 170 ते 175, मटार 35 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.

मोशी उपबाजारातील आवक ः (क्विंटल)
कांदा 421, बटाटा 996, आले 36, लसूण 29, गाजर 97, गवार 7, शेवगा 16, हिरवी मिरची 122, टोमॅटो 393, काकडी 67, भेंडी 54 क्विंटल एवढी आवक झाली आहे.

मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकुण 50400 गड्डी, फळे 293 क्विंटल आणि फळभाज्यांची आवक 3618 क्विंटल एवढी आवक झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या ः दर (प्रति जुडी)
मेथी 20, कोथिंबीर 15, कांदापात 15, शेपू 15, पुदिना 10, मुळा 15, चुका 10, पालक 15.

फळभाज्यांचे ः किलोचे भाव
कांदा 50 ते 60, बटाटा 20 ते 40, आले 180, लसूण 350 ते 410, भेंडी 80 ते 90, टोमॅटो 40 ते 50, सुरती गवार 120, गावरान गवार 100 ते 110, दोडका 80, लाल भोपळा 60 ते 70, कारले 60, मटार 50 ते 70, वांगी 60, भरीताची वांगी 60, तोंडली 60, पडवळ 60, फ्लॉवर 60, कोबी 60, काकडी 40 ते 50, शिमला मिरची 60, शेवगा 150 ते 160, हिरवी मिरची 70 ते 80, वाल 80, राजमा 120, श्रावणी घेवडा 120.

 

Back to top button