Drinking Milk : सावधान ! दुधासोबत हे पदार्थ खाणं आरोग्यासाठी पडू शकतं अत्यंत महागात | पुढारी

Drinking Milk : सावधान ! दुधासोबत हे पदार्थ खाणं आरोग्यासाठी पडू शकतं अत्यंत महागात

पुढारी ऑनलाईन : दूध पिणे अनेकांना आवडतं. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ मिठाई याचे चाहतेही मोठ्याप्रमाणावर आहेत. दुधाकडे परिपूर्ण पोषणाचा स्त्रोत म्हणूनही पहिलं जातं. कॅल्शियमसह शरीरातील अनेक घटकांची कमतरता दुधाच्या सेवनाने भरून निघते. अशा वेळी दूध हा प्रोटीनचा उत्तम सोर्स समजला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का ? प्रोटीनचा उत्तम सोर्स असलेलं दूध काही पदार्थांसोबत खाणं हे आयुर्वेदात वर्ज्य सांगितलं आहे. तर पाहुयात कोणते पदार्थ आहेत हे..

दूध आणि मासे : दूध हे थंडवृत्ती असलेल्या पदार्थात येतं तर मासे हे उष्ण गुणधर्म असलेल्या पदार्थात येतं. त्यामुळे हे एकत्र खाणं आयुर्वेदात निषिद्ध मानलं गेलं आहे. याशिवाय मांसाहारी पदार्थही दुधासोबत खाणं टाळावं. यामुळे अपचनाची समस्या उद्भवू शकते.

दूध आणि गूळ : अनेकजण साखरेला पर्याय म्हणून गूळ वापरतात पण हा पर्याय आरोग्यदायी असला तरी गूळ आणि दुधाचे सेवन पोटासाठी अत्यंत हानिकारक समजलं जातं.

दही आणि दूध : आयुर्वेदानुसार दही आणि दूध एकत्र खाणं निषिद्ध समजलं गेलं आहे. यामुळे पचनशक्तिवर परिणाम होऊन पोट खराब होण्याची संभावना वाढते.

केळी आणि दूध : दूध आणि केळ्याच शिकरण हे महाराष्ट्रातील अनेक घरात आवडीचं खाद्य आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हे मिश्रण आयुर्वेदाने निषिद्ध ठरवलं आहे. अगदीच थकवा असेल तर हे दोन्ही पदार्थ वेगळे खावेत पण यांचं एकत्र सेवन टाळावं.

आंबट फळं : केळ्यांप्रमाणे आंबट फळंही दुधासोबत खाऊ नयेत. यामुळे उलटी किंवा पोटासंदर्भात विकार उद्भवण्याची शक्यता असते.

Back to top button