Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : मराठ्यांबद्दल इतका द्वेष चांगला नाही, जरांगेंचे भुजबळांना प्रत्युत्तर

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : मराठ्यांबद्दल इतका द्वेष चांगला नाही, जरांगेंचे भुजबळांना प्रत्युत्तर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : भुजबळांना आधिपासूनच माणुसकी नाही. हेकेखोरपणामुळे त्यांनी स्वत:चे घर तोडले. ते सगळे पक्ष तोडत गेले. तुम्ही आधी मराठ्यांना तोडले आता जोडायची भाषा करू नका. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एक आहेत. आमच्यात तेढ निर्माण करू नका. बीडमध्ये कोणी जाळपोळ केली हे भुकबळांना माहिती आहे, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे-पाटील यांनी दिले. छगन भुजबळ यांच्या हिंगोलीतील सभेनंतर जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा भुजबळांवर हल्लाबोल केला.

जरांगे पुढे म्हणाले की, आमच्या नोंदी सापडल्या आम्हाला आरक्षण द्या. त्यांच्या नोंदी नाहीत मग हे थेट बाहेर जाणार. चिथावणीखोर विधान भुजबळ करत आहेत, मी नाही. त्यांना दोन समाजात तेढ करायचा आहे. माझे पाय तोडायला या, मी वाट पाहतोय. भुजबळांच्या एकाही कॉलेजला फुलेंचे नाव नाही. आम्ही तुमच्या पंगतीत आलो नाही, सगळी पंगतच आमची आहे. भुजबळांना काही कळत नाही, त्यांचे केस उगाच पांढरे झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

ओबीसी समाज देशाचा निर्माणकर्ता : छगन भुजबळ

ओबीसी समाजासाठी मंडल आयोगाने शिफारस केलेल्या २७ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली होती. त्याबद्दल राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी पवार यांचे आभार मानले. त्यावेळी पवार यांना आरक्षण देण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार नव्हता. असे सांगून ओबीसी समाज हा देशाचा निर्मातकर्ता आहे. त्यामुळे आमची लायकी काढण्याचे काही कारण नाही, असे सांगत ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय सेवेत मराठा समाज वरचढ असताना ओबीसीतून आरक्षण कशासाठी असा सवाल केला. हिंगोली येथे आयोजित एल्गार सभेत ते आज (दि.२६) बोलत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news